सकळाच्या नाश्त्याला (Breakfast) रोज काय नवीन करावं ते अनेकदा सुचत नाही. (Rice dhokla recipe) अशावेळी तुम्ही झटपट तयार होणारे पदार्थ बनवू शकता. (White Dhokla Recipe) यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि घरातील सगळेजण आवडीने खातील. (Instant Rice Dhokla Recipe) तांदळाचा ढोकळा करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make Rice Dhokla at Home) ढोकळा बनवायचा म्हणलं की डाळ भिजवणं, डाळ दळणं अशा प्रकिया कराव्या लागतात पण तुम्ही यातलं काहीही न करता अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मऊ, फुललेला ढोकळा बनवू शकता. (Rice Dhokla Kasa kartat)
तांदळाचा ढोकळा करण्यासाठी काय साहित्य लागते? (White Dhokla Recipe in Marathi)
1) स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ- १ वाटी
२) ताजे दही - १ वाटी
३) हिंग- पाव टिस्पून
४) आल्याचे तुकडे- १ इंच
५) हिरव्या मिरच्या - २ ते ३
६) मीठ- चवीनुसार
७) इनो- १ पाकीट
फोडणीसाठी
१) मोहोरी- एक टिस्पून
२) कढीपत्ता- ८ ते १०
३) भाजलेली चण्याची डाळ- १ ते २ चमचे
४) तेल - गरजेनुसार
ढोकळा बनवण्याची कृती (How to make Rice Dhokla at Home)
१) सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात १ कप तांदूळ काढून घ्या त्यानंतर त्यात १ कप दही, आल्याचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि मीठ घालून एकजीव करून घ्या. नंतर हे मिश्रण दळून एका भांड्यात काढून घ्या. त्यात वाटीभर रवा घाला आणि १० मिनिटं झाकून ठेवा.
साखर-गूळ न घालता करा पौष्टीक ड्रायफ्रुट्सचे लाडू; हिवाळ्यात रोज १ लाडू खा-हाडं होतील स्ट्राँग
२) एका फोडणी पात्रात तेल गरम करून तेलात मोहोरी, हिंग, कढीपत्ता, मिरची, भाजलेली चण्याची डाळ घालून फोडणी तयार करून घ्या. ही फोडणी तयार ढोकळ्याच्या मिश्रणात घाला. त्यात इनो आणि थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
थंडीत खायलाच हवी मुळ्याची चटपटीत चटणी, महिनाभर टिकणाऱ्या मुळ्याच्या चटणीची सोपी रेसिपी
३) एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवून त्यावर रिंग ठेवून ढोकळ्याचे बॅटर त्यात भरून हे भांडे रिंगवर ठेवा. ढोकळ्याला रंग येण्यासाठी मिश्रणात वरून लाल तिखट घाला. १० ते १५ मिनिटांनी ढोकळा बनून तयार होईल. तयार ढोकळा चटणीबरोबर सर्व्ह करा.