Lokmat Sakhi >Food > डाळ-तांदूळ न वाटता; १५ मिनिटांत करा तांदळाच्या पिठाचा डोसा; सोपी रेसिपी-चवीला भारी

डाळ-तांदूळ न वाटता; १५ मिनिटांत करा तांदळाच्या पिठाचा डोसा; सोपी रेसिपी-चवीला भारी

How To Make Rice Floor Dosa : अनेकांना डोसा घरी बनवणं अवघड वाटतं कारण डोसा बनवण्यासाठी डाळ वाटणं,  तांदूळ भिजवणं, पीठ तयार करणं या सर्व प्रोसेस कराव्या लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 18:48 IST2024-11-17T15:33:46+5:302024-11-19T18:48:34+5:30

How To Make Rice Floor Dosa : अनेकांना डोसा घरी बनवणं अवघड वाटतं कारण डोसा बनवण्यासाठी डाळ वाटणं,  तांदूळ भिजवणं, पीठ तयार करणं या सर्व प्रोसेस कराव्या लागतात.

How To Make Rice Floor Dosa : Rice Floor Dosa Recipe How To Make Rice Dosa | डाळ-तांदूळ न वाटता; १५ मिनिटांत करा तांदळाच्या पिठाचा डोसा; सोपी रेसिपी-चवीला भारी

डाळ-तांदूळ न वाटता; १५ मिनिटांत करा तांदळाच्या पिठाचा डोसा; सोपी रेसिपी-चवीला भारी

आपण साऊथ इंडियन पदार्थांबाबत विचार करायचं ठरवलं तर डोसा सर्वांचा फेव्हरीट असतो. मसाला डोसा, साधा डोसा, नीर डोसा, बीटरूट डोसा, शेजवान डोसा सर्वांनाच आवडतो. डोसा घरीच बनवणं ही तितकचं सोपं आहे (Cooking Hacks). अनेकांना डोसा घरी बनवणं अवघड वाटतं कारण डोसा बनवण्यासाठी डाळ वाटणं,  तांदूळ भिजवणं, पीठ तयार करणं या सर्व प्रोसेस कराव्या लागतात. इंस्टंट डोसा करण्याची  सोपी रेसिपी पाहूया. तांदूळाच्या पिठापासून तुम्ही सुंदर डोसा बनवू शकता. (How To Make Rice Floor Dosa) 

डोळ्याचं बॅटर मिक्स तांदूळ आणि तीन प्रकारच्या डाळींपासून बनवू शकता. हा कुरकुरीत डोसा करण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. स्वादीष्ट सांबार चटणीबरोबर तुम्ही हा डोसा खाऊ शकता. ही रेसिपी लवकरात लवकर बनून तयार होते. जेव्हा तुमच्या घरी पाहूणे येणार असतील तेव्हा तुम्ही हा कुरकुरीत, टेस्टी डोसा बनवू शकता.

अभ्यास करूनही कमीच मार्क मिळतात? ४ पद्धती मुलांना शिकवा,अभ्यासाला बसा म्हणावंच लागणार नाही..

तांदूळाच्या पिठाचा डोसा करण्याची सोपी पद्धत

1) एका भांड्यात तांदूळाचं पीठ आणि रवा घ्या यात कांदा, गाजर, हिरवी मिरची या भाज्या घाला. नंतर जीरं आणि मीठ घाला नंतर पाणी एकत्र मिसळा. बॅटर जास्त घट्ट असू नये, डोश्याच्या पिठाप्रमाणे पातळ असावं. 

2) ५ मिनिटांसाठी असंच ठेवा नंतर चमच्याने मिसळा. एक पॅन गरम करा त्यात तेल परसवा. नंतर पातळ बॅटरने वाटी भरून घ्या नंतर तव्यावर पसरवून घ्या. 

3) २ ते ३ मिनिटांनी डोसा उलटा करा.  क्रिस्पी, ब्राऊन डोसा झाल्यानंतर पुन्हा उलटा करा. दुसऱ्या बाजूनं शिजल्यानंतर सांबार किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.

Web Title: How To Make Rice Floor Dosa : Rice Floor Dosa Recipe How To Make Rice Dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.