खिरीचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. हा गोड पदार्थ सणाच्या दिवशी किंवा खास प्रसंगांना आवर्जून बनवला जातो. श्रावण (Sawan 2023) महिन्यात बरंच गोड धोड बनवलं जातं. नेहमी बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरच्याघरी नैवेद्य बनवला तर सगळेच पोटभर खातील. रव्याचा शीरा आणि खीर नेहमीच नैवेद्यासाठी बनवले जाते. (Easy Recipe of rice kheer for naivedya) बदल म्हणून तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता. ही खीर बनवण्यासाठी तुम्हाला आधी भात शिजवून तासनतास घालवण्याची अजिबात गरज लागणर नाही. १० ते १५ मिनिटांत चविष्ट खीर बनून तयार होईल. नैवेद्याासाठी किंवा पाहुणे आल्यानंतर ताटात वाढण्यासाठी ही खीर उत्तम ऑपश्न आहे. (How to Make Rice Kheer Chawal ki Kheer)
तांदळाची खीर बनवण्याची सोपी पद्धत
१)सगळ्यात आधी तुपात ड्रायफ्रुट्स घालून भाजून घ्या. त्यानंतर ड्रायफ्रुट्स बाजूला काढून त्यात स्वच्छ धुवून घेतलेल तांदूळ घालून भाजून घ्या.
२) तांदूळ गोल्डन रंग येईपर्यंत भाजल्यानंतर त्यात दूध घाला. दूध उकळ्यानंतर त्यात १ चमचा वेलची पावडर घालून चमच्याने ढवळत राहा. त्यात केशराचं दूध मिसळून पुन्हा ढवळा.
३) त्यानतंर यात वाटीभर साखर घाला. खीर व्यवस्थित एकजीव करून मंद आचेवर शिजवून घ्या. खिरीवर साय दिसू लागली की ढवळून तळलेले ड्रायफ्रुट्स त्यात घाला. तयार आहे गरमागरम तांदळाची खीर.
कुकरमध्ये झटपट तांदळाची खीर कशी बनवायची?
2 मोठे चमचे तांदूळ व्यवस्थित धुवून २० ते २५ मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये अर्धा लिटर दूध घालून ते उकळण्यासाठी ठेवा. ४ छोट्या वेलच्या बारीक करून दुधात घाला. दुधाला उकळ आल्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ घाला त्याआधी तांदळाचे पाणी काढून घ्या.
नंतर १ टेबलस्पून कापलेले बदाम, १ टेबलस्पून कापलेले काजू, १ टेबलस्पून कापलेला नारळ, १ चमचा चारोळी, १ टेबलस्पून मनुके आणि वेलची घाला. यात ३ चमचे साय घालून मिसळा. नंतर कुकर बंद करून एक शिट्टी होईपर्यंत हाय फ्लेमवर शिजवा. शिट्टी झाल्यानंतर ५ मिनिटांसाटी शिजवा. मग कुकर थंड होऊ द्या. कुकर थंड झाल्यानंतर त्यात १/४ कप साखर घाला. साखर वितळल्यानंतर फ्लेम बंद करून थंड होऊ द्या. तयार आहे गरमागरम स्वादीष्ट तांदळाची खीर.