Join us  

दोडक्याची भाजी आवडत नसेलही पण खाऊन पाहा दोडक्यांच्या सालींची चटणी, रेसिपी सोपी- चव चमचमीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2024 5:42 PM

Food And Recipe: दोडक्याची भाजी करत असाल आणि त्याच्या साली किंवा शीरा मात्र काढून फेकून देत असाल तर तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून पाहिलीच पाहिजे...(ridge gourd chutney recipe in marathi)

ठळक मुद्देअनेक वेगवेगळ्या पद्धतींनी ही चटणी करता येते. आता आपण दक्षिण भारतीय पद्धतीने दोडक्याच्या सालींची चटणी कशी करायची ते पाहूया..

दोडक्याची भाजी म्हटलं की आधीच बरेच जण नाक मुरडतात. त्यात मग चव बदल करून भाजी करण्याचा प्रयत्न अनेक जणी करतात. पण तरीही दोडक्याला म्हणावं तसं प्रेम मिळतच नाही. म्हणूनच आता ही एक रेसिपी करून पाहा. दोडक्याची भाजी करताना आपण त्याच्या साली किंवा शिरा काढून टाकतो. पण त्याच साली अतिशय पौष्टिक असतात. म्हणून त्यांची चटपटीत चटणी कशी करायची ते पाहा (how to make ridge gourd chutney). ही चटणी तुम्ही पराठा, पोळी, डोसा, इडली यांच्यासोबत खाऊ शकता. अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी ही चटणी करता येते. आता आपण दक्षिण भारतीय पद्धतीने दोडक्याच्या सालींची चटणी कशी करायची ते पाहूया.. (ridge gourd chutney recipe in marathi)

 

दोडक्याच्या सालींची चटणी करण्याची रेसिपी

ही रेसिपी home_sattva या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

दोडक्याच्या साली

अर्धा टीस्पून हरबरा डाळ

सारा अली खान म्हणते- मेरे लिये कोई कुछ नही करनेवाला... हे मला खूप लवकर समजलं, कारण...

अर्धा टिस्पून उडीद डाळ

थोडीशी कोथिंबीर

आल्याचा एखादा इंचाचा तुकडा

कडिपत्त्याची ८ ते १० पाने

२ ते ३ हिरव्या मिरच्या

वजन- शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळता? बघा बटाटा खाऊनही वजन कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या टिप्स

चिंचेचा छोटासा तुकडा

चवीनुसार मीठ

फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग

पाव वाटी खोबऱ्याचा किस

 

कृती

सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाली की त्यामध्ये हरबरा डाळ आणि उडीद डाळ टाकून थोडं भाजून घ्या.

व्यायाम करूनही पोट, मांड्या सुटतच चालल्या? वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जेवताना ४ पथ्यं पाळा

यानंतर त्यातच दोडक्याच्या साली, कडिपत्ता, कोथिंबीर, आलं, चिंचेचा तुकडा, मिरच्या असं सगळं टाकून चांगलं परतून घ्या आणि मीठ, थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून वाफ काढून घ्या. 

यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून त्याची बारीक चटणी करून घ्या. या चटणीला तुम्ही फोडणी घालू शकता किंवा मग नाही घातली तरी चालते. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती