फुटाणे बहुतांश जणांना खायला आवडतात. भूक लागल्यावर मुठभर फुटाणे खायला काहीच हरकत नाही. कारण ते खूप पौष्टिक असतात. शिवाय वेटलॉस करणाऱ्या मंडळींनाही ते उपयुक्त ठरतात असं आहारतज्ज्ञ, डॉक्टर नेहमीच सांगतात. शाकाहारी लोकांसाठी तर फुटाणे हा प्रोटीन्सचा एक अतिशय उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे लहान मुलांनाही फुटाणे आवर्जून खायला द्यावेत (how to make roasted chana at home?). याशिवाय सर्दी, कफ असा त्रास कमी करण्यासाठीही फुटाणे उपयुक्त ठरतात. आता बाजारातून वारंवार फुटाणे विकत आणणं होत नसेल, पण तुमच्याकडे हरबरे मात्र भरपूर असतील, तर त्यांचा वापर करून घरच्याघरी अर्धा ते पाऊण तासांत फुटाणे कसे तयार करायचे ते पाहा.. (simple and easy recipe of making futane or roasted chana at home)
घरच्याघरी फुटाणे कसे तयार करायचे?
घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने फुटाणे कसे तयार करावेत, याची रेसिपी cooking_with_anita_2021 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे अशा ५ गोष्टी, एकाग्रता वाढून अभ्यासात मन रमेल- तब्येतही सुधारेल
साहित्य
१ वाटी हरबरे
१ वाटी मीठ
१ टीस्पून हळद
कृती
सगळ्यात आधी तर एका वाटीमध्ये पाणी घ्या. त्यामध्ये एखादा चमचा मीठ टाका आणि हळद टाका.
आता हे हळद आणि मिठाचं पाणी हरबऱ्यांवर लावा. हरबरे व्यवस्थित ओलसर होतील, अशा पद्धतीने पाणी लावावं.
डोशाच्या पीठापासून करा ५ चवदार पदार्थ, एकदाच पीठ करा- वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या
त्यानंतर १० मिनिटांसाठी मीठ- हळदीचं पाणी लावलेले हरबरे झाकून ठेवा.
यानंतर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. त्या कढईमध्ये मीठ टाका. कढईतलं मीठ चांगलं गरम झालं की त्यामध्ये मीठ- हळदीच्या पाण्यात भिजवलेले हरबरे टाका आणि वारंवार हलवत भाजून घ्या.
यावेळी गॅसची फ्लेम मध्यम ते मोठा अशी असावी. काही मिनिटांनी हरबरे चांगले भाजले जातील आणि त्यांची टरफलं निघू लागतील. अशी टरफलं मोकळी होऊ लागली की गॅस बंद करा आणि मीठासकट फुटाणे एका पसरट भांड्यात काढून घ्या.
गरमागरम फुटाणे झाले तयार. या क्रियेमध्ये तुम्ही जे मीठ वापराल ते पुर्णपणे खराब होऊन जाईल आणि पुन्हा वापरण्यायोग्य राहणार नाही.