Join us  

फक्त १० रुपये खर्च, खा चण्याचे लाडू! ठिसूळ झालेली हाडं होतील बळकट-तब्येतही सुधारेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 12:45 PM

How To Make Roasted Chana Laddoo In Simple Way : भाजलेल्या चण्याचे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी बदाम, काजू, पिस्ता बारीक करून  घ्या.  

भाजलेले चणे (Roasted Chana) चवीला खूपच स्वादीष्ट असतात. भारतभरात शेंगदाण्यांबरोबरच भाजलेले चणे खाल्ले जातात. भाजलेले चण्यांच्या मिठाईचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं.  फुटाणे नुसते खायला तुम्हाला कंटाळा येत असेल याचे लाडू बनवून खाऊ शकता. या लाडवांमध्ये तूपाचे प्रमाण अत्यंत कमी असते. ही एक ऑईल फ्री मिठाई आहे. तुम्ही खास प्रसंगाना तुम्ही  हे लाडू बनवू शकता किंवा रोज खाण्यासाठीही उत्तम पर्याय आहेत. (How To Make Roasted Chana Ladoo)

रिसर्चगेटच्या एका रिपोर्टनुसार चणे हा प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्सचा चांगला स्त्रोत आहे.  यात एंटी ऑक्सिडेंट्स कम्पाऊंड्स जसं की पॉलिफेनॉल्स, फायटोन्युट्रिएंट्स, बिटाकॅरोटीन असते. (Ref) फायटो केमिकल्समुळे शरीराला बरेच फायदे मिळतात. यात व्हिटामीन बी-६, व्हिटामीन १२, व्हिटामीन सी असते. ज्यामुळे हृदयाच्या विकारांचा धोका टाळण्यासही मदत होते. ज्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. 

चण्याचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य (How To Make Chana Ladoo)

१) भाजलेल्या चण्याचं पीठ- १ कप

२) तूप - अर्धा कप

३) साखर-  ३ कप

४) बदाम - १ टेबलस्पून

५) काजू - १ टेबलस्पून

६) पिस्ता -१ टेबलस्पून

७) वेलची पावडर- अर्धा टेबलस्पून

 चण्याचे लाडू कसे करायचे? (Chana Ladoo Recipe)

भाजलेल्या चण्याचे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी बदाम, काजू, पिस्ता बारीक करून  घ्या.  नंतर गॅसवर एक कढईत ठेवा.  कढई व्यवस्थित गरम होऊ द्या.  त्यानंतर त्यात  चण्याचं पीठ घालून व्यवस्थित भाजून घ्या. मंच आचेवर १० ते १५ मिनिटं चण्याचे लाडू भाजून घ्या. जेव्हा हे मिश्रण हलकं फ्राय होईल तेव्हा गॅस बंद करा नंतर थंड होऊ द्या.

पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यात वाटलेली साखर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिसळून घ्या.  नंतर यात काजू, पिस्ता आणि बदाम घाला आणि हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्या. नंतर हातांनी छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे लाडू वळून घ्या. तयार आहेत भाजलेल्या चण्यांचे लाडू, हे लाडू तुम्ही एअरटाईल डब्ब्यात ठेवू शकता. हे लाडू महिलाभर चांगले राहतात. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स