दुपारच्या जेवणांतर संध्याकाळच्या टी टाईमची छोटीशी भूक आपल्याला सगळ्यांनाचं सतावते. चहासोबत स्नॅक्स, प्रवासांत खाण्यासाठी, संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी असा जास्त काळ टिकणारा स्नॅक्स प्रकारांतील पदार्थ म्हणजे चिवडा. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आपण चहासोबत फरसाण, चकली शेव, गाठीया असे अनेक मसालेदार पदार्थ खातो. गरमागरम चहासोबत, संध्याकाळच्या भुकेसाठी काहीतरी मसालेदार, झणझणीत खावंसं वाटलं तर चिवडा हा एक उत्तम पर्याय आहे. सध्या बाजारांत चिवड्याचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. चटपटीत चणाडाळीपासून ते बारीक शेव घालून तयार केलेला चिवडा असे विविध प्रकारचे असंख्य चिवड्याचे प्रकार आपण नक्कीच खाल्ले असतील.
चिवडा म्हणजे लहान मुलांचाच काय पण अगदी मोठ्या माणसांचाही विक पाॅईंट. संध्याकाळी चार वाजता टी टाईम झाला की काहीतरी तोंडात टाकावेसे वाटते. अशा वेळी चिवडा नेहमी हाताशी असायलाच हवा. पाहूणे आले आता ऐनवेळी झटपट काय करायचे, अशा विचारात असताना घरात अगदी तयार असणाऱ्या चिवड्याचा मोठाच आधार होतो. मुलांना स्नॅक्ससाठी डब्यात द्यायलाही चिवडा अगदी उपयुक्त ठरताे. असा हा सगळ्यांना हवाहवासा वाटणारा चिवडा झटपट घरच्या घरी बनवायची सोपी कृती पाहूयात(How To Make Roasted Poha Chivda At Home By Using Only 2 Tablespoons Oil).
साहित्य :-
१. पातळ पोहे - २ मोठे कप २. सुक खोबर - ३ टेबलस्पून(लहान लहान तुकडे करून घेतलेलं)३. भोपळ्याच्या बिया - २ टेबलस्पून ४. कडीपत्ता - २० ते २५ पाने ५. हिरव्या मिरच्या - २ (बारीक कापून घेतलेल्या) ६. शेंगदाणे - १/२ कप ७. काजू - १/२ कप (छोटे तुकडे करून घेतलेले)८. बदाम - १/२ कप ९. तेल - ४ ते ५ टेबलस्पून १०. हळद - १/२ टेबलस्पून ११. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून १२. आमचूर पावडर - १/२ टेबलस्पून१३. मीठ - चवीनुसार १४. पिठी साखर - १ टेबलस्पून १५. चाट मसाला - १/२ टेबलस्पून १६. बडीशेप - १ टेबलस्पून १७. मनुके - १/२ कप
अस्सल कोल्हापूरी झणझणीत भडंग करण्याची पारंपरिक रेसिपी, चहासोबत भडंग आणि निवांत गप्पांचा बेत...
कृती :-
१. सर्वप्रथम एका कढईमध्ये, चिवड्याचे पातळ पोहे कोरडेच भाजून घ्यावेत. हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत. २. आता कढईमध्ये थोडे तेल घेऊन त्यात बदाम, काजूचे तुकडे, सुक खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे घालून तेलावर हलकेच परतून घ्यावे. ३. त्यानंतर याच मिश्रणात भोपळ्याच्या बिया, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व कडीपत्ता घालून घ्यावा, सर्वात शेवटी यात मनुके घालावे.
सकाळी नाश्त्याला घाईत फक्त १० मिनिटांत करा झटपट ‘मसाला पराठा’, चव उत्तम-नाश्ता पोटभर...
घरच्या घरीच बनवा प्रोटीन रिच मखाणा भेळ, बनवायला सोपी... खायला हेल्दी...
४. आता या मिश्रणात हळद, लाल तिखट मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर, बडीशेप, पिठी साखर व चवीनुसार मीठ घालून घ्यावे. ५. हा मसाला तयार झाल्यानंतर त्यात सर्वात शेवटी कोरडे भाजून घेतलेले पोहे घालावेत. ६. आता हे पोहे त्या तयार मसाल्यात व्यवस्थित मिसळून घ्यावेत.
पावसाळ्यात पोह्यांचा चिवडा सादळू नये म्हणून ५ टिप्स, करा पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा...
संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी कुरकुरीत पातळ पोह्यांचा नमकीन चिवडा खाण्यासाठी तयार आहे.