चहाला वेळ नसतो, मात्र वेळेला चहा लागतोच. आपल्या भारतात चहा प्रेमींची कमी नाही. जस जसं चहा पिण्याची क्रेज लोकांमध्ये वाढली आहे, तस तसं चहामध्ये देखील वैविध्यता आणली जात आहे. चहा प्रेमींसाठी चहा म्हणजे स्वर्गसुख. बासुंदी चहा, बदाम - पिस्ता चहा, इराणी चहा, आसाम चहा, यासह अनेक चहाचे प्रकार केले जातात.
घरात साधारण चहापत्ती, साखर आणि दुधाचा चहा केला जातो. व दिवसातून दोन वेळा हाच चहा प्यायला जातो. सध्या प्रत्येक पदार्थात रोस्टचा ट्विस्ट देण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. आपण चहामध्ये देखील रोस्टचा ट्विस्ट देऊन पाहू शकता. नेहमीच्या चहाला ब्रेक देऊन आपण घरात रोस्टेड चहा करून पाहू शकता. हटके रोस्टेड चहा आपल्याला नक्की आवडेल यात काही शंका नाही(How to make roasted tea at home?).
रोस्टेड चहा करण्यासाठी लागणारं साहित्य
चहापत्ती
वेलची
तांदूळ नको नी सोडा नको, करा २ डाळींची पौष्टिक इडली, नाश्ता स्पेशल प्रोटीन इडली- सोपी रेसिपी!
साखर
दूध
कृती
सर्वप्रथम, पॅनमध्ये २ चमचे चहापत्ती घालून भाजून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा. चहापत्ती भाजून झाल्यानंतर त्यात एक कप साखर घाला. त्यानंतर त्यात सोललेली वेलची घालून भाजून घ्या. जोपर्यंत साखर विरघळत नाही, तोपर्यंत चमच्याने सतत ढवळत राहा. साखर विरघळल्यानंतर त्यात २ कप गरम दूध घालून मिक्स करा.
सणावाराला करा ओल्या नारळाची चविष्ट खीर, कमी वेळात - मेहनत न घेता झटपट खीर होईल रेडी
एक कप घ्या, त्यावर चहाची गाळणी ठेवा, व त्यातून चहा गाळून घ्या. अशा प्रकारे रोस्टेट चहा पिण्यासाठी रेडी. आपण रोस्टेड चहाचा आस्वाद रिमझिम पडणाऱ्या पावसासोबत लुटू शकता.