Join us  

गव्हाची पोळी पचत नाही? पोट फुगल्यासारखं वाटतं? कणकेत घाला २ गोष्टी; चपात्या होतील मऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2024 10:00 AM

How to make roti easily digestible? Why is roti difficult to digest? : गव्हाची पोळी पचत नसेल तर, त्यात २ गोष्टी घालायला विसरू नका..

पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही (Chapati). अन्न नीट न पचल्याने पोटाचे विकार आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो (Digestion). बद्धकोष्ठतेमुळे पोट फुगणे, पोटदुखी, आंबट ढेकर येणे, मळमळ यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. वेळीच यावर उपचार न केल्यास मुळव्याधीची समस्या निर्माण होऊ शकते (Food).

पोटाचे विकार वाढल्यावर आपण खाण्यावर कण्ट्रोल ठेवतो. कधीकधी चपातीही पचत नाही. दुपार किंवा रात्रीच्या जेवणात आपण चपाती खातोच. पण जर चपाती पचत नसेल तर, कणिक मळताना २ गोष्टी घाला. यामुळे गव्हाची पोळी व्यवस्थित पचेल. पचनक्रियेत अडथळे येणार नाही(How to make roti easily digestible? Why is roti difficult to digest?).

गव्हाची पोळी करताना कणकेत २ गोष्टी मिसळा

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी, कणकेत २ गोष्टी मिसळा. आपण त्यात ओट्स आणि ओवा देखील मिसळू शकता. फायबर समृद्ध ओट्स आणि ओव्यामध्ये आढळणारे घटक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात. शिवाय पचनक्रियेत अडथळे येणार नाही.

केळी रोज खाता, पण त्यासोबत 'हे' ४ पदार्थही खाता? पोट बिघडलेच म्हणून समजा

ओट्स

ओट्समध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, आयर्न, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात. जे पचन सुधारण्यास मदत करतात. ओट्समध्ये मुबलक प्रमाणात बीटा ग्लुकन असते, जे आतडे स्वच्छ करण्याचे काम करते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो.

वाढलेलं वजन काही केल्या कमी होत नाही? पिटुकल्या मेथी दाण्यांचे 'करा' ३ सोपे उपाय; वजन घटणारच..

ओवा

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कणिक मळताना त्यात ओवा घाला. ओव्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टीरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. आपण नियमित कणकेत ओवा घालून चपात्या करू शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.