Lokmat Sakhi >Food > चपात्या वातड होतात? मऊ, पापुद्रा सुटलेली, घडीची चपाती करण्याची योग्य पद्धत, पाहा सोपं सिक्रेट

चपात्या वातड होतात? मऊ, पापुद्रा सुटलेली, घडीची चपाती करण्याची योग्य पद्धत, पाहा सोपं सिक्रेट

How to make roti perfect : चपाती बनवून १ तास झाल्यानंतर लगेच त्याचा पापड होतो तर कधी कडक चपात्या खाल्ल्याही जात नाही.  चपात्या कडक होऊ नयेत म्हणून काही सोप्या ट्रिक्स पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 02:00 PM2023-04-09T14:00:15+5:302023-04-09T14:38:53+5:30

How to make roti perfect : चपाती बनवून १ तास झाल्यानंतर लगेच त्याचा पापड होतो तर कधी कडक चपात्या खाल्ल्याही जात नाही.  चपात्या कडक होऊ नयेत म्हणून काही सोप्या ट्रिक्स पाहूया.

How to make roti perfect : Tips & Tricks to Make Round & Soft Phulka | चपात्या वातड होतात? मऊ, पापुद्रा सुटलेली, घडीची चपाती करण्याची योग्य पद्धत, पाहा सोपं सिक्रेट

चपात्या वातड होतात? मऊ, पापुद्रा सुटलेली, घडीची चपाती करण्याची योग्य पद्धत, पाहा सोपं सिक्रेट

चपाती प्रत्येकाच्या रोजच्या जेवणातला एक भाग आहे. उन्हाळ्याच्या दिवसात चपात्या केल्यानंतर लगेच कडक होतात. त्यामुळे व्यवस्थित जेवण जात नाही अशी अनेकांची तक्रार  असते. चपात्या हा प्रत्येक घरात बनवला जाणारा कॉमन पदार्थ असला तरी प्रत्येकाची चपाती बनवण्याची पद्धत वेगळी असते. (Tips & Tricks to Make Round & Soft Phulka) काहीजणी मोठ्या चपात्या करतात तर काहीजणांचे फुलके असतात. चपाती बनवून १ तास झाल्यानंतर लगेच त्याचा पापड होतो तर कधी कडक चपात्या खाल्ल्याही जात नाही.  चपात्या कडक होऊ नयेत म्हणून काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How to make roti perfect)

चपातीचं पीठ मळण्याची ट्रिक

- तुम्ही जितकं व्यवस्थित पीठ मळाल तितकंच चपाती चांगली तयार होईल.  चपातीचं पीठ मळताना गरज वाटल्यास तेलाचा हात लावा. हात ओले करून आणखी 2 ते 4 मिनिटे पीठ मळा. असे केल्याने पीठ मऊ होईल आणि चपात्याही बराच काळ मऊ राहतील.

- पीठ मळताना तूप वापरल्यास चपात्या मऊ राहतात.  पीठ चांगले मळून घ्या आणि पूर्ण मऊ झाल्यावर तळहातावर थोडे तूप घेऊन संपूर्ण पीठाला लावून पीठ पुन्हा २ ते ३ मिनिटे मळून घ्या. नंतर ओल्या कापडाने झाकून पीठ बाजूला ठेवा.

नवीन पद्धतीनं १० मिनिटात करा रवा इडली;  मऊ, फुगणाऱ्या इडल्यांची एकदम सोपी रेसिपी

-  घरात दूध किंवा दही असेल तर ते पाण्यात मिसळा आणि या मिश्रणाने पीठ मळून घ्या. चपत्या  मऊ राहतील. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त दूध किंवा दह्यात मैदा मिसळून चपात्या बनवू शकता.

- कणिक भिजवल्या भिजवल्या लगेच पोळ्या लाटू नका. थोडा वेळ जाऊ द्या. कणिक भिजवल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. खूप मोठ्या किंवा खूप मंद आचेवर केलेल्या पोळ्या बऱ्याचदा कडक होतात किंवा मग कच्च्या राहतात. त्यामुळे पोळ्या करताना गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवा.

१ कप तांदळाचे करा १० ते १५ जाळीदार डोसे; १० मिनिटात तयार होतील मऊ मस्त डोसे

- चपाती तव्यावरून खाली काढली की खूप जास्त वेळ तशीच ठेवू नका. ती दुमडून ठेवा थोड्या वेळानं कापड झाकून ठेवा. तशीच ठेवली तर ती कडक होऊ लागते. 

Web Title: How to make roti perfect : Tips & Tricks to Make Round & Soft Phulka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.