Join us  

ना पोळपाट ना लाटणं, वाटीने करा एकावेळी दोन गोल पोळ्या एकदम झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2024 7:09 PM

How to make Roti Without Roller Belan : पोळ्या करण्याचा अनेकांना कंटाळा येतो, त्यातूनच सुचलेली ही युक्ती असावी

चपाती, पोळी आणि रोटी. नावं अनेक पण प्रकार एक. चपाती करणं म्हणजे वाटतं तितकं सोपं नाही. अगदी पीठ मळण्यापासून ते चपाती शेकण्यापर्यंत, सर्वकाही एक कौशल्याचं काम आहे. पोळी तयार करताना चपाती आकाराने गोल होईलच असे नाही. बऱ्याचदा विविध देशांचा नकाशा तयार होतो. कधी-कधी कणिक मळताना प्रमाण चुकते, किंवा लाटताना गडबड होते. ज्यामुळे चपात्या व्यवस्थित मऊ तयार होत नाही.

बहुतांश जणींना कणिक व्यवस्थित मळता येते. पण चपाती लाटताना त्यांचा घाम गळतो. चपाती कधी जाड तरी कधी खूपच पातळ तयार होते. शेकल्यानंतर चपाती फुलत नाही, ती पापडासारखी कडक होते. जर आपल्याला कमी वेळात न लाटता चपात्या गोल तयार करायच्या असतील तर, वाटीच्या मदतीने चपातीला गोल आकार द्या. या सोप्या ट्रिकमुळे एकाच वेळी २ चपात्या तयार होतील(How to make Roti Without Roller Belan).

कोण म्हणतं चटणीमधून प्रोटीन मिळत नाही? खोबरे-हरबरा डाळ-तीळ-पाहा हाडांसाठी पोषक चटणी

ना पोळपाट ना लाटणं-वाटीने तयार करा पोळ्या

सर्वप्रथम, ज्याप्रमाणे आपण पोळ्या करण्यासाठी कणिक मळून घेतो. तसे कणिक मळून घ्या. कणिक १० ते १५ मिनिटांसाठी भिजवण्यासाठी ठेवा. जर आपल्याला पोळपाट आणि लाटण्याचा वापर न करता पोळ्या तयार करायच्या असतील तर, २ ताट आणि एक मोठी वाटी घ्या.

भोगीला तीळ लावून बाजरीची भाकरी करताना लक्षात ठेवा २ टिप्स, भाकरी वातड होणार नाहीत

एक मोठं ताट घ्या, ते ताट उलटं ठेवा. त्यावर मध्यम आकाराचे कणकेचे दोन गोळे ठेवा. गोळा ठेवताना त्यावर पीठ लावा. जेणेकरून गोळे एकमेकांना चिकटणार नाही. नंतर त्यावर दुसरं ताट ठेवा, आणि ताटावर वाटी ठेवा. वाटीने हलके दाब देऊन वाटी ताटाच्या भोवतीने फिरवा. यामुळे काही सेकंदात २ पोळ्या एकाच वेळी आकाराने गोल अशा तयार होतील.

दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर हलक्या हाताने चपाती उचलून घाला, व दोन्ही बाजूने शेकून घ्या. या ट्रिकमुळे काही मिनिटात गोल टम्म फुगलेली चपाती तयार होईल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स