Lokmat Sakhi >Food > ऋषिपंचमी विशेष : तेलाचा थेंबही न वापरता करा ऋषीची भाजी, पौष्टिक आणि चविष्ट भाजीची पारंपरिक रेसिपी...

ऋषिपंचमी विशेष : तेलाचा थेंबही न वापरता करा ऋषीची भाजी, पौष्टिक आणि चविष्ट भाजीची पारंपरिक रेसिपी...

Rishi Panchami Bhaji : Rushichi Bhaji : ऋषीपंचमी निमित्त अनेक रानभाज्या, पालेभाज्या, कंदमुळं वापरुन ऋषीची भाजी बनवण्याची पद्धत आहे, पहा रेसिपी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2023 10:00 AM2023-09-19T10:00:00+5:302023-09-20T15:57:18+5:30

Rishi Panchami Bhaji : Rushichi Bhaji : ऋषीपंचमी निमित्त अनेक रानभाज्या, पालेभाज्या, कंदमुळं वापरुन ऋषीची भाजी बनवण्याची पद्धत आहे, पहा रेसिपी....

How to make Rushichi Bhaji. | ऋषिपंचमी विशेष : तेलाचा थेंबही न वापरता करा ऋषीची भाजी, पौष्टिक आणि चविष्ट भाजीची पारंपरिक रेसिपी...

ऋषिपंचमी विशेष : तेलाचा थेंबही न वापरता करा ऋषीची भाजी, पौष्टिक आणि चविष्ट भाजीची पारंपरिक रेसिपी...

आज आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पाच आगमन मोठ्या धुमधडाक्यात, वाजत - गाजत झालं आहे. पुढचे १० दिवस प्रत्येकाच्याच घरी गणपती बाप्पाचा  हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे. या दिवसांत प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे खास पदार्थ बनवले जातात. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. महाराष्ट्रातील गावोगावी हरतालिकेप्रमाणेच ऋषीपंचमीचं सुद्धा व्रत मनोभावे केले जातं.  भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषिपंचमी म्हणतात. (Rishi Panchami Bhaji : Rushichi Bhaji)

शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्न पदार्थ ऋषीपंचमीच्या (Check How to Make Rushichi Bhaji on the Occasion of Rishi Panchami) दिवशी खाल्लेच जात नाहीत. अशी प्रथा आहे. म्हणूनच या दिवशी  रानभाज्या  आणि कंदमुळं खाल्ली जातात. ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात आणि त्यांचीच एकत्रित भाजी (Rushipanchami Bhaji Authentic Maharastrian Recipe) या दिवशी बनविली जाते. या भाजीत मुख्य भाजी ही अळूची असते त्यात या सगळ्या भाज्या एकत्र केल्या जातात. गणेशोत्सवा दरम्यान पावसाळा असतो आणि पावसाळ्यात अनेक पालेभाज्या सहज उपलब्ध असतात त्या भाज्यांचा वापर सुद्धा ऋषीच्या भाजीमध्ये (Celebrating Rishi Panchami with Rushi chi Bhaji) केला जातो. विशेष करुन कोकणात ऋषिपंचमीच्या दिवशी या ऋषींच्या भाजीला विशेष महत्व असते. ही ऋषीची भाजी नेमकी बनवायची कशी ते पाहूयात(Rishi Panchami Special: Make Rushi Chi Bhaaji This Ganesh Chaturthi).

साहित्य :- 

१. अळूची पाने - १ कप (बारीक चिरलेली)
२. लाल माठ - १ कप (बारीक चिरलेला)
३. अळूचे देठ - १ कप 
४. मका - अर्धा
५. शिराळी - १ कप 
६. दुधी भोपळा - १ कप 
७. गाजर - १ कप 
८. भेंडी - १ कप 
९. कच्ची केळी - १ कप 
१०. चवळीच्या शेंगा - १ कप 
११. काटेकणीस किंवा रताळी - १ कप 
१२. भोपळा - १ कप 
१३. सुरण - १ कप 
१४. हिरव्या मिरच्या - ६ ते ७ 
१५. ओलं खोबरं - १ कप 
१६. चिंचेचा कोळ - ४ ते ६ टेबलस्पून 
१७. मीठ - चवीनुसार
१८. शेंगदाणे - १ कप (उकडवून घेतलेले)

फक्त २० मिनिटांत करा १ कप रव्याचे मोदक, फ्रिजमध्ये १० दिवसही टिकणाऱ्या मोदकांची सोपी रेसिपी...

गणपतीचे आवडते गूळ खोबरे खाण्याचे १० फायदे, देवाला नैवेद्य आपल्याला पौष्टिक प्रसाद...

कृती :- 

१. वरील सर्व भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून चिरुन घ्याव्यात. 
२. सुरण किंवा इतर वापरली जाणारी कंदमुळं स्वच्छ धुवून ती कापून उकडवून घ्यावीत. 
३. सर्वप्रथम एका पॅनमध्ये अळूची बारीक चिरलेली पाने, लालमाठाची पाने व हिरव्या मिरच्या घेऊन ते मंद आचेवर परतून घ्यावे. 
४. आता यात बारीक किसलेल ओलं खोबर, अळूचे देठ, मका, शिराळी, दुधी, गाजर, ओलं खोबर, मीठ, चिंचेचा कोळ, चिरलेली भेंडी घालावी. 

सुबक कळीदार मोदक करण्याची १ झटपट ट्रिक - मोदक न जमणारेही करतील उत्तम मोदक...

प्रसादाचा शिरा परफेक्ट कसा करायचा ? शिरा भगराळा होऊ नये, गाठी राहू नये म्हणून सोप्या टिप्स...

५. त्यानंतर कच्ची केळी, चवळीच्या शेंगा, काटेकणीस, भोपळा, सुरण, पुन्हा हिरवी मिरची व चिंचेचा कोळ, ओलं खोबरं, मीठ, पाणी घालूंन घ्यावे.
६. भांडयात भाजीचे थर लावून मग सगळ्यांत शेवटी चमच्याच्या मदतीने ढळवळून घ्यावे. 
७. आता या भांड्यावर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे ही भाजी वाफेवर संपूर्णपणे शिजवून घ्यावी. 

उकडीच्या मोदकांचे गणित जमत नाहीत, उकडताना फुटतात ? १० सोप्या टिप्स, कळीदार सुबक मोदक सहज जमतील...

सणावाराला भाज्या करताना करा झणझणीत ग्रेव्ही, ग्रेव्ही चमचमीत होण्यासाठी १३ सोप्या टिप्स, बेत जमेल मस्त...

आपली ऋषीपंचमी निमित्त केली जाणारी खास ऋषीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. 

Web Title: How to make Rushichi Bhaji.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.