Lokmat Sakhi >Food > साबुदाणा कबाब कधी खाल्ले आहेत का? करा घरच्याघरी खास शाकाहारी खमंग कबाब

साबुदाणा कबाब कधी खाल्ले आहेत का? करा घरच्याघरी खास शाकाहारी खमंग कबाब

उपवासालाच आपण साबुदाणा वापरतो पण तसे न करता साबुदाण्याचा असा छान खमंग वापरही करता येतो. करा साबुदाणा कबाब. (How to make sabudana kabab, how to make veg kabab, sabudana kabab recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 03:28 PM2022-08-19T15:28:55+5:302022-08-19T15:30:55+5:30

उपवासालाच आपण साबुदाणा वापरतो पण तसे न करता साबुदाण्याचा असा छान खमंग वापरही करता येतो. करा साबुदाणा कबाब. (How to make sabudana kabab, how to make veg kabab, sabudana kabab recipe)

How to make sabudana kabab, how to make veg kabab, sabudana kabab recipe) | साबुदाणा कबाब कधी खाल्ले आहेत का? करा घरच्याघरी खास शाकाहारी खमंग कबाब

साबुदाणा कबाब कधी खाल्ले आहेत का? करा घरच्याघरी खास शाकाहारी खमंग कबाब

Highlightsहे कबाब बाहेरुन छान खमंग आणि आतून मऊ-लूसलूशीत होतात. सोबत हिरवी पुदिना चटणी आवश्यकच.

कबाब. हा शब्द ऐकूनच तोंडाला पाणी सुटते. पण अनेकांचं म्हणणं असं की कबाब शाकाहारी नसतातच. पण प्रयत्न केले तर आपण एकदम चविष्ट शंभर टक्के शाकाहारी कबाबही बनवू शकतो. ते ही सोप्या पद्धतीने. अर्थात प्रत्येक पदार्थाची आपली एक खाद्य परंपरा असते, तशी ती कबाबांची आहे. मात्र शाकाहारी घटक वापरुनही आता फ्यूजनच्या जमान्यात आपण जरा वेगळा प्रयोग करु शकतो.
म्हणून हे साबुदाण्याचे कबाब. अर्थात साबुदाणा आहे म्हणजे हा पदार्थ उपवासाचाच आहे असं गृहित धरु नका. हे उपवासाला चालणारे नाहीत, फक्त साबुदाणा वापरुन एक वेगळा खास पदार्थ झटपट करता येऊ शकतो.


(Image : google)

साहित्य

साबुदाणे पाव वाटी भिजवून, बटाटा 2 मध्यम उकडून सोलून किसून, बिट 1 उकडून सोलून किसून, दाणे कूट थोडेसे अथवा १०/१२ काजूची भरड पूड, कोणताही शाही बिर्याणी गरम मसाला चवीनुसार, आले मिरची लसूण कोथिंबीर पुदीना बारीक चिरून,
लिंबू रस/आमचूर, मीठ,साखर, हळद आणि लाल तिखट.

 


(Image : google)

कृती

सर्व साहित्य एकत्र करावे. पाणी अजिबात लावायचे नाही. जे साहित्य आहे त्यातला ओलावा पुरेसा असतो. तितपतच हातानं चांगलं मळून घ्यायचं हे मिश्रण. एकदम घट्ट हवे. मग त्याचे लांबट गोळे करून त्यात लाकडी स्क्यूएर खुपसून सारखे करावे. स्क्यूएर नसतील तरीही हरकत नाही,लांबट चपटे गोळे करून दहा एक मिनिटे फ्रीजमध्ये उघडे ठेवावे.
दहा मिनिटांनी बाहेर काढावे. आता कबाब चांगले खुटखुटीत झालेले असतील.
आता पॅनमध्ये तूप गरम करून दोन्ही बाजूने लालसर होईतो खरपूस भाजून घ्यावे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे कबाब तळायचे नाहीत. मंद आचेवर तुपावर खरपूस जरा निवांत भाजायचे आहेत. घाईत मोठा गॅस करुन भाजू नयेत.
वाटलं तर कटलेटला लावतो त्याप्रमाणे बाहेरून कुरकुरीत हवे असल्यास, रवा/ब्रेड क्रंप्स/शेवई चुरा लावता येईल. नाही लावलं तरी चालतं. हे कबाब बाहेरुन छान खमंग आणि आतून मऊ-लूसलूशीत होतात. सोबत हिरवी पुदिना चटणी आवश्यकच.

Web Title: How to make sabudana kabab, how to make veg kabab, sabudana kabab recipe)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न