Join us  

साबुदाणा न भिजवताही करा उत्तम साबुदाणा खिचडी, १ ट्रिक - करा झटपट खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2023 2:42 PM

How to Make Sabudana Khichdi without Soaking साबुदाणा भिजत घालण्याचं टेन्शन सोडा, काही मिनिटात साबुदाणा तयार करण्याची सोपी ट्रिक पाहा

उपवास म्हटलं आपण प्रत्येक जण साबुदाण्याचे पदार्थ तयार करतो. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाण्याची खीर यासह अनेक प्रकार साबुदाण्याचा वापर करून तयार करण्यात येतो. साबुदाणा दाणेदार भिजल्यानंतर त्याचे पदार्थ छान तयार होतात. परंतु, अनेकदा साबुदाणा भिजत घातल्यानंतर त्याचा गचका होतो. नीट भिजत नाही, तर कधी कच्चा राहतो. साबुदाणा भिजवण्यासाठी खूप वेळ लागतो.

अनेक जण रात्रीच्या वेळी साबुदाणा भिजत घालतात. व सकाळी त्याचे विविध पदार्थ करतात. पण जर आपण साबुदाणा भिजत घालायला विसरलो तर? साबुदाणा न भिजवता त्याची खिचडी तयार करायची असेल तर, ही ट्रिक आपल्याला मदत करेल. या एका ट्रिकमुळे साबुदाणा रात्रभर भिजत घालण्याची गरज पडणार नाही(How to Make Sabudana Khichdi without Soaking).

साबुदाणा न भिजवता खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य

साबुदाणा

पाणी

दही

हिरवी मिरची

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट

हॉटेलस्टाईल पेपर डोसा करण्याची सोपी पद्धत, डोसे होतील क्रिस्पी - एकदम विकतसारखेच

मीठ

साखर

कृती

साबुदाणा शिजवण्याची पद्धत

सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात एक कप साबुदाणा घ्या. त्यात दोन कप पाणी घालून, दोन वेळा धुवून घ्या. यामुळे साबुदाण्यातील स्टार्च निघून जाईल. साबुदाणा धुवून झाल्यानंतर त्यातून अतिरिक्त पाणी काढा. पाणी काढल्यानंतर त्यात दीड चमचे दही घालून मिक्स करा. जर आपल्याकडे दही नसेल तर, अर्धा चमचा लिंबाचा रस, किंवा ताकाचा वापर करा. त्यानंतर त्यात एक चमचाभर तेल किंवा साजूक तूप घालून मिक्स करा. सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर त्यात दीड चमचे पाणी घालून मिसळून घ्या.

कांदे साठवताना टाळा ४ चुका, कांद्यांना कोंब फुटणार नाही - टिकतील दीर्घकाळ फ्रेश

साबुदाणा शिजवण्यासाठी कुकरचा वापर करा. कुकरमध्ये २ कप पाणी घालून गॅस मध्यम आचेवर ठेवा. त्यानंतर त्यात कुकरचं भांडं ठेवा. कुकरच्या भांड्यावर त्याच मापाचे झाकण ठेवा. व कुकरचं झाकण लावून बंद करा. कमीत कमी ३ शिट्ट्यांमध्ये साबुदाणा शिजून तयार होईल. ३ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण खोलून कुकरचं भांडं बाहेर काढा. व चमच्याच्या सहाय्याने जेवढा मोकळा करता येईल, तेवढा साबुदाणा मोकळा करून घ्या.

या पद्धतीने करा साबुदाणा खिचडी

कढईत ४ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, शिजवून घेतलेला साबुदाणा, पाव वाटी भाजलेल्या दाण्याचं कूट, चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर घालून चमच्याने मिक्स करा. जस जसं आपण चमच्याने साबुदाण्याला ढवळत राहू, तस तसं साबुदाणा मोकळा होईल. साबुदाणा मोकळा झाल्यानंतर त्यात चमचाभर पाणी शिंपडा व त्यावर झाकण ठेऊन द्या. वाफेवर साबुदाणा शिजल्यानंतर झाकण बाजूला काढा, व तयार साबुदाण्याची खिचडी एका बाऊलमध्ये काढून सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स