Join us  

फक्त १ कप साबुदाणा आणि उकडलेला बटाटा- करा उपवासाचे नगेट्स! कुरकुरीत-चव कमाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2024 3:02 PM

Sabudana & Potato Nuggets : Crispy Sabudana Potato Nuggets Recipe : Farali Sabudana Potato Nuggets : How To Make Sabudana Potato Nuggets : साबुदाणा - बटाटा वापरुन नेहमीचे तेच ते फराळाचे पदार्थ करण्यापेक्षा खुसखुशीत नगेट्स नक्की खाऊन पाहा...

नवरात्रीचा सण सुरु होण्यासाठी आता फक्त दोनच दिवस बाकी आहेत. या नऊ दिवसांत अनेकजण उपवास देखील करतात. उपवास म्हटलं की आपण काही ठराविक पदार्थच खाऊ शकतो. या ठराविक पदार्थांमध्ये सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे साबुदाणा आणि बटाटा. उपवासाचे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी प्रामुख्याने साबुदाणे आणि बटाटा यांचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. साबुदाण्याची खिचडी, खीर, चकली, वडे, बटाट्याचे वेफर्स, चिवडा असे अनेक पदार्थ उपवासाला (Fasting Recipe) आपण आवडीने खातो. काहीवेळा उपवासाला सारखे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशावेळी तेच साबुदाणा आणि बटाटे वापरून आपण काहीतरी नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ तयार करु शकतो(Crispy Sabudana Potato Nuggets Recipe).

आजकाल बाजारांत वेगवेगळ्या प्रकारचे नगेट्स मिळतात. हे नगेट्स लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच विशेष आवडीचे असतात. इतर वेळी आपण टी टाईम स्नॅक्स, पार्टी स्नॅक्स किंवा मुलांच्या टिफिनमध्ये खाऊ म्हणून बाजारांत विकत मिळणारे रेडिमेड नगेट्स आणून खातो. परंतु जर तुम्ही उपवासाला असे नगेट्स खाण्याचा विचार करत असाल तर याच नेहमीच्या साबुदाणा आणि बटाट्याचा वापर करून झटपट तयार होणारे उपवासाचे नगेट्स तयार करु शकता. उपवासाचे नगेट्स तयार करण्यासाठीची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Sabudana Potato Nuggets).

साहित्य :- 

१. बटाटे - ४ (बटाटे उकडवून घेतलेले) २. साबुदाणा - १ कप (कोरडा भाजून घ्यावा)३. शेंगदाण्याचा कूट - १ कप ४. हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून ५. साखर - १ टेबलस्पून ६. जिरे - १ टेबलस्पून ७. मीठ - चवीनुसार ८. लिंबाचा रस - २ ते ३ टेबलस्पून  ९. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)  १०. तेल - तळण्यासाठी

गरम पाण्याच्या किटलीत करा १० मिनिटांत पोडी इडली, पाहा इडलीपात्राशिवाय झटपट इडली करण्याची रेसिपी...

नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...

कृती :- 

१. सगळ्यात आधी बटाटे उकडवून घ्यावेत. त्यानंतर साबुदाणे कोरडे भाजून घेऊन ते मिक्सरला वाटून त्याची बारीक पूड करून घ्यावी. २. आता एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे घेऊन त्याची सालं काढून ते मॅश करून घ्यावेत. या मॅश बटाट्यांमध्ये साबुदाण्याची वाटून घेतलेली बारीक पूड घालावी. यासोबतच यात शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक करून घालावा. 

हिरवीगार चटणी लवकर काळी पडते? ३ टिप्स, चटणीचा रंग आणि चव बदलणे शक्यच नाही...

३. त्यानंतर यात हिरव्या मिरचीची मिक्सरला वाटून बारीक केलेली पेस्ट घालावी. यासोबतच जिरे, साखर, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर असे सगळे जिन्नस घालावेत. त्यानंतर हे सगळे जिन्नस एकत्रित मिक्स करून मळून घ्यावे. हे मिश्रण थोडे मध्यम कन्सिस्टंन्सीचे मळून घ्यावे. ४. हे मिश्रण मळून झाल्यानंतर त्याचे मोठे रोल करुन घ्यावेत. त्यानंतर सुरीच्या मदतीने या रोलचे छोटे - छोटे तुकडे करून घ्यावेत. ५. आता यातील एक एक तुकडा घेऊन त्याला आपल्या आवडीप्रमाणे गोल, दंडगोलाकार किंवा आपल्या आवडीप्रमाणे आकार घेऊन नगेट्स तयार करून घ्यावेत. ६. एका कढईत तेल घेऊन त्यात हे नगेट्स सोडून बाहेरुन गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यावेत.

उपवासाचे नगेट्स खाण्यासाठी तयार आहेत हे नगेट्स आपण दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४अन्नपाककृतीनवरात्रीनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४