Lokmat Sakhi >Food > फक्त वाफेवर, इडली पात्रात करा साबुदाण्याचे कुरकुरीत पापड, पीठ शिजवणे - वाळवणे अशी झंझट विसरा!

फक्त वाफेवर, इडली पात्रात करा साबुदाण्याचे कुरकुरीत पापड, पीठ शिजवणे - वाळवणे अशी झंझट विसरा!

How To Make Sabudana Steamed Papad At Home : how to make sabudana papad in idli stand : Sabudana papad in idli cooker : चक्क इडली पात्रात साबुदाण्याचे पापड कसे तयार करायचे त्याची सोपी झटपट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 18:53 IST2025-02-26T18:41:26+5:302025-02-26T18:53:40+5:30

How To Make Sabudana Steamed Papad At Home : how to make sabudana papad in idli stand : Sabudana papad in idli cooker : चक्क इडली पात्रात साबुदाण्याचे पापड कसे तयार करायचे त्याची सोपी झटपट रेसिपी...

How To Make Sabudana Steamed Papad At Home how to make sabudana papad in idli stand Sabudana papad in idli cooker | फक्त वाफेवर, इडली पात्रात करा साबुदाण्याचे कुरकुरीत पापड, पीठ शिजवणे - वाळवणे अशी झंझट विसरा!

फक्त वाफेवर, इडली पात्रात करा साबुदाण्याचे कुरकुरीत पापड, पीठ शिजवणे - वाळवणे अशी झंझट विसरा!

सध्या गुलाबी थंडी संपून उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. उन्हाळा म्हटलं की आपल्याला आठवण येते ती वाळवणाच्या पदार्थांची. आजही अनेक घरात वर्षभर पुरतील इतके वाळवणाचे पदार्थ एकदम (How To Make Sabudana Steamed Papad At Home) एकाच वेळी तयार केले जातात. या पदार्थांमध्ये लोणची, पापड, मुरांबा, फेण्या, कुरडया अशा अनेक पदार्थांचा समावेश असतो. यातही प्रत्येक घरात हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे (how to make sabudana papad in idli stand) साबुदाण्याचे पापड. साबुदाण्याचे पापड खायला कुरकुरीत आणि चवीला फारच टेस्टी लागतात, परंतु हे पापड तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते(Sabudana papad in idli cooker).

साबुदाणा भिजवून मग तो हलकासा शिजवून घ्यावा लागतो त्यानंतर एका प्लॅस्टिक  कागदावर हे बॅटर ओतून त्याचे पापड तयार करून घ्यावे लागतात. हे पापड संपूर्णपणे वाळवून घेण्यासाठी आपल्याला किमान ३ ते ४ दिवस उन्हात वाळवून घ्यावे लागतात. परंतु काहीवेळा हे पापड व्यवस्थित वाळत नाहीत, असे ओलसर पापड आपण स्टोअर करून ठेवले तर ते लवकर खराब होतात. याचबरोबर हे बॅटर काहीवेळा नीट शिजवले जात नाही त्यामुळे त्यातील साबुदाणे कच्चेच राहतात. अशा गृहिणींच्या अनेक तक्रारी असतात यासाठीच अगदी झटपट आणि फारसे कष्ट न घेता चक्क इडली पात्रात साबुदाण्याचे पापड कसे तयार  करायचे त्याची सोपी झटपट रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. साबुदाणा - २ ते ३ कप (भिजवून घेतलेला) 
२. मीठ - चवीनुसार
३. पाणी - गरजेनुसार 

कडीपत्ता महिनाभर राहील ताजा, पाहा १ भन्नाट टिप - रंग - सुवास आणि चव टिकेल जास्त दिवस...


पोहे - खोबऱ्याची मऊसूत इडली! हलकी - फुलकी इडली खाण्याचा घ्या आनंद, ही घ्या झटपट रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एक मोठा बाऊल घेऊन त्यात साबुदाणे आणि गरजेनुसार पाणी ओतून साबुदाणे ६ ते ७ तासांसाठी भिजत ठेवावेत. 
२. मग ६ ते ७ तासांनंतर साबुदाणे व्यवस्थित भिजल्यावर त्यातील जास्तीचे पाणी निथळून काढून घ्यावे. 
३. आता या साबुदाण्यात चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण चमच्याने हलवून मीठ एकजीव करून घ्यावे. 
४. इडली पात्र घेऊन त्यात हे तयार साबुदाण्याचे बॅटर चमच्याने ओतून हाताने हलकासा दाब देत पापडाचा गोलाकार आकार तयार करून घ्यावा. 

५. आता हे इडली पात्र गॅसवर ठेवून १० ते १२ मिनिटांसाठी इडल्या वाफवतो तसे हे साबुदाण्याचे पापड वाफवून घ्यावेत. 
६. वाफवून झाल्यानंतर अलगद हाताने या भांड्यातून पापड काढून घेऊन एका डिशमध्ये पसरवून २ ते ३ दिवस उन्हात वाळण्यासाठी ठेवून द्यावे. 
७. साबुदाण्याचे पापड व्यवस्थित वाळल्यानंतर ते एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवून द्यावेत. 

पीठ न शिजवता, उन्हात जास्त दिवस न वाळवता आणि फारसे कष्ट न घेता अगदी झटपट होणारे साबुदाण्याचे पापड तयार आहेत.

Web Title: How To Make Sabudana Steamed Papad At Home how to make sabudana papad in idli stand Sabudana papad in idli cooker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.