श्रावण मासी हर्ष मानसी. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात श्रावणाला सुरुवात होते (Shravan). श्रावण महिन्याची सुरुवात होताच काही लोक सोमवारचा उपवास धरतात (Sabudana Vada). उपवासादरम्यान आपण साबुदाणा खिचडी, वडे, थालीपीठ किंवा खीर तयार करून खातो (Food). पण सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा वडे (Cooking tips).
साबुदाणे वडे बनवायला सोपे आणि खायला रूचकर, चविष्ट लागतात. पण साबुदाणा नीट भिजला नाही की, वडे फुटतात किंवा तेलकट होतात. हॉटेलस्टाईल कुरकुरीत साबुदाणे वडे करायचे असतील तर, या पद्धतीने साबुदाणे वडे करून पाहा. परफेक्ट न फुटणारे कमी तेल पिणारे साबुदाणे वडे तयार होतील(How to make sabudana vada less oily).
कुरकुरीत साबुदाणे वडे करण्यासाठी लागणारं साहित्य
साबुदाणा
बटाटे
हिरवी मिरची
जिरं
कोथिंबीर
न लाटता आगरी पद्धतीची तांदुळाची भाकरी करायची? एक जबरदस्त युक्ती; भाकरी फुगेल टम्म
तेल
मीठ
कृती
सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक कप साबुदाणे घ्या. त्यात पाणी घालून धुवून घ्या. साबुदाणे धुवून झाल्यानंतर त्यात थोडं पाणी तसेच ठेवा. त्यावर झाकण ठेवा. ६ ते ७ तासांसाठी साबुदाणे भिजत ठेवा.
रव्याचे लाडू फसतात-कडक किंवा मऊ होतात? १ कप रव्याचे लाडू करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी
साबुदाणे भिजल्यानंतर दाणेदार दिसतील. आता त्यात एक कुस्करून उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, एक चमचा जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व साहित्य हाताने एकजीव करा, व छोटे - छोटे मिश्रणाला गोलाकार द्या.
दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात वडे सोडून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. अशाप्रकारे कुरकुरीत साबुदाणे वडे खाण्यासाठी रेडी. अशा पद्धतीने साबुदाणे वडे केल्यास तेलात फुटणार नाहीत.