Lokmat Sakhi >Food > हॉटेलसारखा टेस्टी सांबार घरीच करायचाय? सांबार मसाल्याची खास रेसिपी पाहा, चव परफेक्ट

हॉटेलसारखा टेस्टी सांबार घरीच करायचाय? सांबार मसाल्याची खास रेसिपी पाहा, चव परफेक्ट

How To Make Sambar Masala At home : सांबार मसाल्यामुळे सांबारला एक वेगळाच फ्लेवर मिळतो ज्यामुळे सांबारची टेस्ट वाढते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 05:35 PM2024-09-01T17:35:17+5:302024-09-02T18:56:23+5:30

How To Make Sambar Masala At home : सांबार मसाल्यामुळे सांबारला एक वेगळाच फ्लेवर मिळतो ज्यामुळे सांबारची टेस्ट वाढते.

How To Make Sambar Masala At home : Sambar Masala Making Tips How To Make sambar Masala in Easy Way | हॉटेलसारखा टेस्टी सांबार घरीच करायचाय? सांबार मसाल्याची खास रेसिपी पाहा, चव परफेक्ट

हॉटेलसारखा टेस्टी सांबार घरीच करायचाय? सांबार मसाल्याची खास रेसिपी पाहा, चव परफेक्ट

इडली, डोसा, मेदूवडा हे पदार्थ साऊथ इंडियन (South Indian Dishes) डिशेसमध्ये खूप प्रसिद्ध असून भारतभरातील लोक या पदार्थांचे नाश्त्याला आणि जेवणाला सेवन करतात.  सांबारमुळे फक्त तोंडाची चव वाढत नाही तर चवीला अत्यंत पौष्टीक असतो. सांबार बनवण्यासाठी सांबार मसाला हा उत्तम ठरतो. अनेक मसाले वाटून सांबार मसाला बनवला जातो. (How To Make Sambar Masala  At home)

सांबार मसाल्यामुळे सांबारला एक वेगळाच फ्लेवर मिळतो ज्यामुळे सांबारची टेस्ट वाढते. ज्या दिवशी सांबार बनवायचा असतो तेव्हा लोक बाजारातून सांबार मसाला आणतात आणि घरी सांबार करतात.  सांबार मसाला घरीच केला तर त्याची चव एकदम ताजी लागेल. याशिवाय घरी बनवलेला असल्यामुळे यात भेसळही असणार नाही. 

सांबार मसाला करण्यासाठी करण्यासाठी लागणारं साहित्य

१) धणे  - २ चमचे
२) मेथी दाणे - २ चमचे
३)  कढीपत्ता - १० ते १५ पानं
३) जीरं- दीड चमचा
४) मोहोरी- १ चमचा
५) हिंग- दीड चमचा
६) लाल मिरची पावडर- दीड चमचा
७) हळद पावडर - अर्धा चमचा
८) कढीपत्त्याची पावडर - १ चमचा
९) दालचिनी - १ चमचा
१०) लवंग- १ चमचा
११) काळी मिरी- १० ते १२ 

सांबार मसाला करण्याची कृती

हा मसाला जास्त प्रमाणात तयार करून वर्षभर साठवून ठेवू  शकता. सांबार मसाला एकदा बनवल्यानंतर १ वर्ष चांगला राहतो.  सांबार मसाला बनवण्यासाठी  सगळ्यात आधी एका कढईत मध्यम आचेवर धणे,मेथीचे दाणे, कढीपत्ता, जीरं, मोहोरी, हिंग भाजून घ्या.

चेहऱ्यावर बारीक रेषा-सुरकुत्या आल्यात? 2 रूपयांच्या तुरटीची कमाल, सुरकुत्या गायब-तेज येईल

या पदार्थांना भाजल्यामुळे यातील मॉईश्चर निघून जाते आणि मसाले एकदम सुकले होतात. मसाले भाजल्यानंतर भाजलेल्या मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, कढीपत्ता,  दालचिनी, लवंग आाणि काळी मिरी व्यवस्थित मिसळा.

शरीरातील हाडांना एकदम पोकळ बनवते व्हिटामीन B-12 ची कमी; 5 लक्षणं दिसताच सावध व्हा

सर्व मसाले व्यवस्थित शेकल्यानंतर गॅस बंद करा नंतर मसाले थंड होऊ द्या.  जेव्हा मसाले थंड होतील तेव्हा त्यांना मिक्सरमध्ये घालून  वाटून पावडर तयार  करा. ही सांबार पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या. एकदम फ्रेश आणि शुद्ध सांबार मसाला  बनून तयार असेल. हा मसाला तुम्ही एअरटाईट बरणीत भरून एखाद्या थंड किंवा सुक्या जागेवर ठेवू शकता. 

Web Title: How To Make Sambar Masala At home : Sambar Masala Making Tips How To Make sambar Masala in Easy Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.