Join us  

ब्रेड न वापरता करा भरपूर प्रोटिन्स देणारं सुपरहेल्दी सॅण्डविच- मुलांनाही आवडेल, बघा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2024 3:38 PM

How To Make Sandwich Without Bread: ब्रेड असतो म्हणून अनेक जण सॅण्डविच खाणं टाळतात. असं तुमचंही असेल तर ब्रेड न वापरता केलेलं हे सुपर हेल्दी सॅण्डविच खाऊन बघाच... (high protein sandwich recipe)

ठळक मुद्देनाश्त्यासाठी हा पदार्थ तर एकदम छान आहेच, पण मुलांना डब्यात देण्यासाठीही अगदी परफेक्ट आहे.

सॅण्डविच हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. नाश्ता असो, संध्याकाळचं स्नॅक्स असो किंवा मग अशीच कधीतरी लागलेली छोटी भूक भागवायची असो... अशावेळचा उत्तम पर्याय म्हणजे सॅण्डविच. सॅण्डविचमध्ये पौष्टिक भाज्या असतात, हे मान्य. पण अनेक जण ब्रेड खात नाहीत. त्यामुळे सॅण्डविच खाणंही ते टाळतात. म्हणूनच मैद्याचा ब्रेड वापरून तयार करण्यात आलेल्या सॅण्डविचपेक्षा हे भरपूर प्रोटिन्स (high protein sandwich recipe) देणारं सुपरहेल्दी सॅण्डविच खाऊन पाहा (How to make sandwich without bread). नाश्त्यासाठी हा पदार्थ तर एकदम छान आहेच (easy and delicious breakfast recipe), पण मुलांना डब्यात देण्यासाठीही अगदी परफेक्ट आहे. ( healthy menu for kids tiffin)

 

ब्रेड न वापरता कसं करायचं सॅण्डविच?

ब्रेड न वापरता सॅण्डविच कसं करायचं याची रेसिपी masterchefshiprakhanna या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य 

१ कप मुगाची डाळ

१० वी- १२ वीची परीक्षा आली, बघा कोणत्या वेळी अभ्यास केल्यावर अधिक पाठांतर होऊ शकते

सिमला मिरची, टोमॅटो, स्वीटकॉर्न, कांदा यांचे काप सगळे मिळून १ कप

१ टीस्पून आलं- लसूण- हिरव्या मिरचीची पेस्ट

चीज

१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

चवीनुसार मीठ

 

कृती

१. सगळ्यात आधी मुगाची डाळ चांगली धुवून घ्या आणि रात्रभर किंवा ७ ते ८ तास पाण्यात भिजवून घ्या.

२. यानंतर सिमला मिरची, टोमॅटो, कांदा या भाज्या बारीक चिरून घ्या. स्वीटकॉर्न असतील तर ते ही वापरा.

तुमच्या टुथपेस्टच्या पाकिटावर कोणत्या रंगाचं मार्किंग आहे? त्याचा काय अर्थ- कोणतं टुथपेस्ट वापरावं, बघा..

३. ७ ते ८ तास पाण्यात भिजलेली मुगाची डाळ आता मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. डाळ वाटताना तिच्यात अगदी थोडंसं पाणी घाला. जास्त पाणी घालून मिश्रण पातळ करू नये.

४. वाटलेल्या डाळीमध्ये आलं- लसूण आणि मिरचीची पेस्ट, थोडंसं मीठ घाला आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात धने- जिरे पूडदेखील घालू शकता.

कम्प्युटरवर काम करून, दुचाकी चालवून मान खूप दुखते? ६ व्यायाम करा, लगेच मिळेल आराम

५. आता सॅण्डविच मेकरला एका बाजूने बटर लावून घ्या. त्यावर वाटलेली डाळ टाका. त्यावर सगळ्या भाज्या, चीज पसरूवन टाका आणि पुन्हा त्या भाज्यांवरून डाळीचे पीठ टाका. त्यानंतर खालून- वरून हे चांगलं खरपूस भाजून घ्या. छान क्रिस्पी सॅण्डविच झालं तयार...

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीलहान मुलं