Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात खायलाच हवी सुंठेची आंबटगोड चटणी, ५ फायदे- पावसाळी हवेत आहारात सुंठ फार महत्त्वाची 

पावसाळ्यात खायलाच हवी सुंठेची आंबटगोड चटणी, ५ फायदे- पावसाळी हवेत आहारात सुंठ फार महत्त्वाची 

Saunth Chutney Recipe: शेंगदाणे, खोबरे चटणी किंवा मिरचीचा ठेचा नेहमीचाच... आता पावसाळी हवेत ही झकास चवीची सुंठ चटणी करून बघा. बघा टेस्टी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 04:28 PM2022-08-04T16:28:38+5:302022-08-04T16:29:29+5:30

Saunth Chutney Recipe: शेंगदाणे, खोबरे चटणी किंवा मिरचीचा ठेचा नेहमीचाच... आता पावसाळी हवेत ही झकास चवीची सुंठ चटणी करून बघा. बघा टेस्टी रेसिपी.

How to make saunth or dry ginger chutney? Very tasty and healthy for rainy season  | पावसाळ्यात खायलाच हवी सुंठेची आंबटगोड चटणी, ५ फायदे- पावसाळी हवेत आहारात सुंठ फार महत्त्वाची 

पावसाळ्यात खायलाच हवी सुंठेची आंबटगोड चटणी, ५ फायदे- पावसाळी हवेत आहारात सुंठ फार महत्त्वाची 

Highlightsया चटणीच्या आंबट- गोड, चटकदार चवीमुळे जिभेचे चोचले तर पुरवले जातीलच पण सोबतच आरोग्याचीही पुरेपूर काळजी घेतली जाईल.

जेवणात तोंडी लावायला चटणी, ठेचा, लोणचं असे पदार्थ असले की जेवणाची रंगत कशी आणखीनच वाढते. एखादी चवदार चटणी (chutney) किंवा लोणचं (pickle) तोंडी लावायला असलं की मग एकवेळ भाजीची चव जरा बिघडलेली असली, तरी धकून जातं. आता खोबऱ्याची, शेंगदाण्याची, जवसाची, कारळाची अशा वेगवेगळ्या चटण्या आपण नेहमीच करतो. शिवाय मिरचीचा ठेचा, पुदिना- कोथिंबीर चटणीही असतेच. पण आता पावसाळी वातावरण आहे तर अशा वातावरणात एकदा ही सुंठ चटणी (How to make saunth or dry ginger chutney) खाऊन बघा. या चटणीच्या आंबट- गोड, चटकदार चवीमुळे जिभेचे चोचले तर पुरवले जातीलच पण सोबतच आरोग्याचीही ( tasty and healthy food for rainy season) पुरेपूर काळजी घेतली जाईल.(food and recipe)

 

सुंठ खाण्याचे फायदे
- सुंठ ही कफनाशक असते. पावसाळ्यात सर्दी, खोकला असा त्रास वारंवार होतो. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी सुंठ उपयोगी ठरते.

विदेशी माणूस पडला सांबारच्या प्रेमात, त्याने सांगितलेली सांबारची चटकदार रेसिपी झाली तुफान व्हायरल, पाहा व्हिडिओ...
- पावसाळ्यात जठराग्नी मंदावल्याने पचनाचा त्रासही अनेकांना जाणवतो. अशावेळीही सुंठ खाणं फायद्याचं ठरतं. कारण त्यामुळे अपचन, ॲसिडिटी, मळमळ असा त्रास कमी होतो.
- मासिक पाळीदरम्यान अनेकींना पोटदुखी, कंबरदुखी असा त्रास होतो. अशावेळी सुंठ घातलेलं गरम पाणी प्यायलं तर बरं वाटतं.
- रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात पुरेशा प्रमाणात सुंठ असावी, असा सल्ला दिला जातो.
- बॅड कोलेस्टरॉलला नियंत्रणात ठेवण्यासाठीही सुंठ खाणं फायद्याचं मानलं जातं.
- डोकेदुखीचा त्रास होत असल्यास सुंठ पावडर आणि मध एकत्र करून घ्यावा.

 

कशी करायची सुंठ चटणी?
साहित्य

सुंठ पावडर १ चमचा, आमचूर पावडर १ चमचा, ८ ते १० खजूर, वेलची पावडर, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, फोडणीसाठी तेल- मोहरी- जिरे- हिंग आणि कढीपत्ता. 
कृती
- सुंठ पावडर, आमचूर पावडर आणि खजूराचे काप हे एका भांड्यात पाणी घेऊन त्यात ४ ते ५ तास भिजू द्या.

झटपट चमचमीत पनीर मसाला करा घरीच ; चव हॉटेलपेक्षा भारी- आणि रेसिपी सुपरफास्ट 
- यानंतर एक कढई गॅसवर गरम करायला ठेवा. कढई तापली की त्यात भिजत ठेवलेली सुंठ पावडर, आमचूर पावडर आणि खजुराचे काप टाका.
- हे मिश्रण जेवढं असेल तेवढंच आणखी पाणी त्यात टाका. आणि सगळं मिश्रण चांगलं शिजू देऊन उकळून घ्या.
- मिश्रण उकळून थोडं घट्ट होऊ लागलं की त्यात मीठ, तिखट, गरम मसाला टाका. कढईवर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या आणि नंतर गॅस बंद करा.
- थंड झाली की हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून वाटून घ्या. या चटणीचा पातळ किंवा घट्टपणा साधारणपणे टोमॅटो सॉससारखा करावा.


- आता ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि त्यावर तेल- मोहरी- जिरे- हिंग आणि कढीपत्ता टाकून केलेली फोडणी घाला.
- जेवणात तोंडी लावायला तर ही चटणी छानच लागते. पण त्यासोबतच पराठ्यासोबतही लोणचं किंवा सॉसऐवजी ही चटणी खाऊ शकता. 
- अधिक चव येण्यासाठी या चटणीमध्ये काळं मीठ, चाट मसालाही टाकू शकता. 

 

Web Title: How to make saunth or dry ginger chutney? Very tasty and healthy for rainy season 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.