Lokmat Sakhi >Food > विकत कशाला आणायची आता घरीच करा झणझणीत शेजवान चटणी, करायला सोपी - टिकेल भरपूर

विकत कशाला आणायची आता घरीच करा झणझणीत शेजवान चटणी, करायला सोपी - टिकेल भरपूर

How to Make Schezwan Chutney at Home, try out this secret tip हॉटेलस्टाईल घरी शेजवान चटणी तयार होत नाही? एक सिक्रेट टीप, चटणी महिनाभर टिकेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 12:28 PM2023-08-16T12:28:44+5:302023-08-16T13:29:29+5:30

How to Make Schezwan Chutney at Home, try out this secret tip हॉटेलस्टाईल घरी शेजवान चटणी तयार होत नाही? एक सिक्रेट टीप, चटणी महिनाभर टिकेल...

How to Make Schezwan Chutney at Home, try out this secret tip | विकत कशाला आणायची आता घरीच करा झणझणीत शेजवान चटणी, करायला सोपी - टिकेल भरपूर

विकत कशाला आणायची आता घरीच करा झणझणीत शेजवान चटणी, करायला सोपी - टिकेल भरपूर

सध्या अनेकांना चायनीज खाण्याचं वेड लागलं आहे. भारतीय लोकं त्याला देसी तडका देऊन, स्पेशल डिश तयार करीत आहे. सायंकाळ झाली की, अनेक ठिकाणी गल्लोगल्ली चायनीजचे स्टॉल लागतात. ज्यात नुडल्स, फ्राईड राईज, मंचुरियन असे पदार्थ मिळतात. या पदार्थांची चव वाढवण्यासाठी आचारी त्यात सिक्रेट चटणी मिक्स करतात. त्या सिक्रेट चटणीचं नाव शेजवान चटणी आहे.

शेजवान चटणीशिवाय या पदार्थांची चव वाढत नाही. पण हॉटेलस्टाईल ही चटणी घरी तयारही होत नाही. जर आपल्याला घरच्या घरी ही चटणी तयार करायची असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. आपण ही चटणी महिनाभर साठवून ठेऊ शकता. चला तर मग झणझणीत शेजवान चटणी कशी तयार करायची हे पाहूयात(How to Make Schezwan Chutney at Home, try out this secret tip).

शेजवान चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

काश्मिरी लाल मिरच्या

तेल

लसूण

आलं

कोथिंबीरीचे देठ

टोमॅटो केचअप

चिली सॉस

सोया सॉस

काळी मिरी पूड

न वाफवता करा दुधी भोपळ्याची वडी, नावडता भोपळाही होईल आवडता, पौष्टिक पोटभर खाऊ

अॅरोमॅट पावडर

साखर

अजिनोमोटो

व्हिनेगर

मीठ

कृती

सर्वप्रथम, १५ ते २० लाल काश्मिरी मिरच्या २ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेल्या लाल मिरच्या घालून त्याची पेस्ट तयार करा. गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात ५ टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात ५ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, २ टेबलस्पून आलं, २ टेबलस्पून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचे देठ घालून, ४ ते ५ मिनिटांसाठी मध्यम आचेवर भाजून घ्या.

स्वातंत्र्य दिन विशेष : १ कपभर मैद्याची करा कुरकुरीत जिलेबी! स्वातंत्र्यदिनी जिलेबीचा बेत तर हवाच..

५ मिनिटं भाजून घेतल्यानंतर, त्यात तयार चिली पेस्ट घालून १० मिनिटांसाठी भाजून घ्या. त्यानंतर त्यात ५ टेबलस्पून केचअप, २ टेबलस्पून रेड चिली सॉस, एक टेबलस्पून सोया सॉस, एक टेबलस्पून काळी मिरी पूड, एक टेबलस्पून अॅरोमॅट पावडर, एक टेबलस्पून साखर घालून ५ मिनिटांसाठी चमच्याने ढवळत राहा. त्यानंतर त्यात एक टेबलस्पून अजिनोमोटो, चवीनुसार मीठ आणि तीन टेबलस्पून व्हिनेगर घालून २ मिनिटांसाठी चमच्याने ढवळत राहा.

अशा प्रकारे शेजवान चटणी खाण्यासाठी रेडी. आपण ही चटणी एका काचेच्या बरणीत भरून साठवून ठेऊ शकता. ही चटणी महिनाभर टिकते.

Web Title: How to Make Schezwan Chutney at Home, try out this secret tip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.