Lokmat Sakhi >Food > कोबी नाही तर करा रव्याचे व्हेज मंचुरियन, चविष्ट झटपट खास छोट्या पार्टीसाठी

कोबी नाही तर करा रव्याचे व्हेज मंचुरियन, चविष्ट झटपट खास छोट्या पार्टीसाठी

How to make Semolina Manchurian Recipe at Home कोबी घालून तर करतोच आता रव्याचे मंचुरियन करून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2023 01:14 PM2023-04-30T13:14:41+5:302023-04-30T13:15:28+5:30

How to make Semolina Manchurian Recipe at Home कोबी घालून तर करतोच आता रव्याचे मंचुरियन करून पाहा

How to make Semolina Manchurian Recipe at Home | कोबी नाही तर करा रव्याचे व्हेज मंचुरियन, चविष्ट झटपट खास छोट्या पार्टीसाठी

कोबी नाही तर करा रव्याचे व्हेज मंचुरियन, चविष्ट झटपट खास छोट्या पार्टीसाठी

संध्याकाळची छोटी भूक लागली की, आपल्याला चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. सध्या अनेकांची पसंती मंचुरियन खाण्यास वळत आहे. कोबीचे कुरकुरीत स्पाईसी मंचुरियन चवीला उत्कृष्ट लागतात. मंचुरियनची क्रेझ लोकांमध्ये वाढत चालली आहे. पण दररोज हा पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

कोबीचे मंचुरियन बनवण्यापेक्षा आपण सुजी म्हणजेच रव्याचे मंचुरियन देखील बनवू शकता. सुजी मंचुरियन चवीला तर उत्तम लागतेच, यासह कमी वेळात, कमी साहित्यात बनते. घरातील सदस्यांना छोटी भूक लागली असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(How to make Semolina Manchurian Recipe at Home).

सुजी मंचुरियन करण्यासाठी लागणारं साहित्य

एक कप रवा

चिमुटभर हळद

मोजून १० मिनिटांत करा कोकण स्टाइल खोबरं-लसणाची चटणी, पारंपरिक लसणीचं तिखट करऱ्याची रेसिपी

अर्धा चमचा लाल तिखट

बारीक चिरलेला कांदा - १

बारीक चिरलेली सिमला मिरची - १

चवीनुसार मीठ

तेल

ग्रेवी करण्यासाठी लागणारं साहित्य

टोमॅटो सॉस - २ टेबलस्पून

सोया सॉस -  १ टेबलस्पून

शेझवान चटणी - २ टेबलस्पून

कांदा - २

सिमला मिरची - १

हिरवी मिरची - २

करा कोबीची कुरकुरीत भजी, चवीला उत्कृष्ट पचायला हलकी

काळी मिरी पावडर

लसणाच्या पाकळ्या

लाल तिखट

तेल

मीठ - चवीनुसार

कोर्न फ्लोर

कृती

सर्वप्रथम, कढई गरम करण्यासाठी ठेवा, त्यात तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा व सिमला मिरची घालून परतवून घ्या. कांद्याला सोनेरी रंग आल्यानंतर त्यात चिमुटभर हळद, लाल तिखट, व चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्स करा. आता त्यात रवा घालून भाजून घ्या. रव्याला सोनेरी रंग आल्यानंतर त्यात पाणी घाला, व वाफ देण्यासाठी त्यावर झाकण ठेवा.

५ मिनिटानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे गोळे तयार करा. दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात रव्याचे मंचुरियन बॉल तळून घ्या. अशा प्रकारे ड्राय रव्याचे मंचुरियन रेडी.

मंचुरियन ग्रेवी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करा, त्यात बारीक चिरलेला कांदा, लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेली हिरवी मिरची, घालून मिश्रण चांगले भाजून घ्या. ५ मिनिटानंतर त्यात काळी मिरी पावडर, व सगळे सॉस घालून मिश्रण मिक्स करा.

ताक म्हणजे उन्हाळ्यात अमृत, पण मीठ घालून ताकात पिताय का? कुणी टाळलेलंच बरं..

मिश्रणात पाणी घाला मिश्रण घट्ट करण्यासाठी त्यात एक टेबलस्पून कोर्न फ्लोरमध्ये पाणी मिक्स करून घाला. यामुळे मिश्रणाला घट्टपणा येईल. आता त्यात तयार ड्राय मंचुरियन बॉल घालून मिक्स करा. २ मिनिटासाठी लो फ्लेमवर मंचुरियन शिजवून घ्या. अशा प्रकारे पौष्टीक्तेने भरपूर सुजी मंचुरियन खाण्यासाठी रेडी. 

Web Title: How to make Semolina Manchurian Recipe at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.