उन्हाळा आला की सगळ्यांच्या घरी वेध लागतात ते साठवणीचे पदार्थ बनवण्याचे. हे साठवणीचे पदार्थ बनवून वर्षभर खाण्यासाठी स्टोअर करुन ठेवले जातात. पापड, सांडगे, मसाले, लोणची, फेण्या, कुरडया असे अनेक पदार्थ आपण वर्षभर पुरतील असे बनवून ठेवतो. परंतु आता बदलत्या काळानुसार फार कोणी वाळवणीचे पदार्थ घरी करायला पाहात नाही कारण ते बाहेर वर्षभर दुकानात रेडिमेड मिळतात.
कुरकुरीत, खुसखुशीत असा पापडाचा प्रकार म्हणजे सालपापड्या. आपल्यापैकी सगळ्यांच्याच लहानपणीच्या पापड बनवण्याच्या अनेक आठवणी असतील. याला सालपापड्या म्हणतात कारण ते सालीसारखे काढून मग वाळवले जातात. सालपापड्या हा प्रकार बहुतेक सगळ्यांच्याच घरी बनवला जातो. काहीजण तांदळाच्या सालपापड्या बनवतात तर काहीजण रव्याच्या. या दोन्ही प्रकारच्या सालपापड्या चवीला अधिकच रुचकर लागतात. यंदाच्या उन्हाळ्यात साठवणीच्या पदार्थांबरोबरच या रव्याच्या सालपापड्या नक्की ट्राय करुन पाहा. १ कप रव्याच्या चौपट फुलणाऱ्या खमंग, कुरकुरीत सालपापड्या बनवण्याची पारंपरिक पद्धत लक्षात ठेवूयात(How To Make Semolina 'salpapadya', small papadi, recipe of traditional papadi).
साहित्य :-
१. बारीक रवा - १ कप २. पाणी - २ ते ३ कप ३. चिली फ्लेक्स - १ ते २ टेबलस्पून ४. कोथिंबीर - १ ते २ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)५. हिरवी मिरची - १ ते २ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)६. मीठ - चवीनुसार
दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत...
कृती :-
१. एका मोठ्या पातेल्यात एक कप बारीक रवा ओतून घ्यावा. २. आता हा संपूर्ण रवा भिजेल इतके पाणी त्यात ओतावे. ३. हा रवा आता संपूर्ण ३ दिवस पाण्यांत भिजत ठेवावा. (रवा पाण्यात भिजत ठेवला असताना प्रत्येक दिवशी त्यातील जुने पाणी ओतून नवीन पाणी घालून घ्यावे.)४. तीन दिवसानंतर रवा संपूर्णपणे पाण्यात भिजून फुलून तयार होतो. आता या रव्याच्यावर थोडासा आंबट वास येणारे पाणी जमा झालेले असेल ते संपूर्णपणे ओतून घ्यावे. ५. त्यानंतर एक मोठं भांड घेऊन त्यात हा रवा ओतून घ्यावा, मग त्यात २ कप पाणी घालावे. हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्यावे.
ताज्या करकरीत कैरीची करा ‘फोडणीची कैरी’; तोंडी लावायला झटपट पदार्थ- उन्हाळा होईल सुसह्य...
कैरी-कोथिंबीर-आणि पुदिन्याची चटकदार आंबट-गोड चटणी खाऊन तर पाहा, सोपी रेसिपी-तोंडाला सुटेल पाणी...
६. मिश्रण शिजवताना ते सतत चमच्याने ढवळत राहावे अन्यथा त्याच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. असे होऊ नये म्हणून मिश्रण चमच्याने सतत ढवळत राहावे. ७. या मिश्रणाला थोडा चमकदार रंग आला मिश्रण किंचित घट्ट झाले की समजावे आपले सालपापड्यांचे पीठ तयार आहे. मग यात चवीनुसार मीठ घालून घ्यावे. त्यानंतर मिश्रण ५ ते ७ मिनिटे ढवळून शिजवून घ्यावे. ८. आता गॅस बंद करून हे मिश्रण १० मिनिटे तसेच ठेवून थोडे थंड होऊ द्यावे. मग यात आपल्या आवडीनुसार चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा हिरवी मिरची घालून घ्यावी.
ना डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज, ना आंबवण्याची; १० मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचे डोसे...
९. हे सगळे जिन्नस एकजीव करुन मग एका प्लॅस्टिकच्या पेपरवर गोलाकार छोट्या छोट्या सालपापड्या घालाव्यात. १०. आता या सालपापड्या उन्हात ३ ते ४ दिवस वाळवून घ्याव्यात. या सालपापड्या उन्हांत दोन्ही बाजुंनी संपूर्ण वाळेपर्यंत सुकवून घ्याव्यात.
संपूर्ण दोन्ही बाजुंनी वाळलेल्या सालपापड्या एका डब्यात भरुन स्टोअर करुन ठेवाव्यात