Join us  

पीठ न आंबवता, न दळता १० मिनिटात करा मऊ -चवदार शेवई इडली; झटपट बनेल पौष्टीक नाश्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 10:26 AM

How to Make Sevai Idli : रवा इडली, तांदळाच्या पीठाची इडली आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या इडल्या खाल्ल्या असतील. शेवयांच्या इडल्याही खायला मऊ चवदार आणि करायला कमी वेळखाऊ, सोप्या असतात.

नाश्त्याला रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला की नेहमीच बाहेरचं काहीतरी वाटतं अशावेळी फास्ट फूड खाण्यापेक्षा  घरच्याघरी उपलब्ध असलेल्या काही पदार्थांपासून  अप्रतिम चवीचा नाश्ता बनवू शकता. (Vermicelli idli recipe instant breakfast recipe) यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. फक्त १० मिनिटात हा पदार्थ बनून तयार होईल. रवा इडली, तांदळाच्या पीठाची इडली आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या इडल्या खाल्ल्या असतील. शेवयांच्या इडल्याही खायला मऊ चवदार आणि  करायला कमी वेळखाऊ, सोप्या असतात. (How to make sevai idli)

शेवयांच्या इडल्या कशा करायच्या?

शेवया इडल्या करण्यासाठी सगळ्यात आधी तेल गरम झाल्यानंतर त्यात २ चमचे मोहोरी, १ चमचा चण्याची डाळ, १ चमचा उडीदाची डाळ, कढीपत्ता, मिरची, काजूचे काप घाला. हे पदार्थ व्यवस्थित तळून घेतल्यानंतर त्यात शेवया घाला. शेवया व्यवस्थित भाजून घाल्यानंतर एका वाडग्यात काढून घ्या आणि त्यात १ वाटी दही घाला. (Vermicelli idli recipe instant breakfast recipe) 

ना तूप, ना मावा २ ग्लास दूधाची करा १ किलो मिठाई; स्वादीष्ट, सोपी कलाकंद रेसिपी, पाहा

अर्धा तास मिश्रण तसंच झाकून ठेवल्यानंतर त्यात कोथिंबीर आणि पाणी घाला. नंतर इडलीच्या भांड्याला तेल लावून ठेवा. साच्यात एक एक काजूचा तुकडा घालून त्यात  शेवयांचे मिश्रण घाला.  १० ते १५ मिनिटं वाफवल्यानंतर तयार होतील गरमागरम इडल्या. 

वाटीभर रव्यात करा १०० पळी पापड, रव्याच्या पळी पापडाची कृती; फॅनच्या हवेतही लगेच सुकतील

शेवयांची पौष्टीक खीरही तुम्ही  दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी खाऊ शकता. शेवयांचा उपमाही बनवायला एकदम सोपा असतो. जर तुम्हाला जास्त वेळ नसेल तर बाजारात शेवई उपम्याचे प्रीमिक्सही उपलब्ध आहे. शेवयांचे अनेक पौष्टीक पदार्थ नाश्ता आणि जेवणासाठी उत्तम पर्याय आहेत.  

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स