शीरा, रव्याची खीर खाऊन कंटाळा आला की सर्वांच्याच घरी शेवयांची खीर बनवली जाते. गुरुवारच्या नैवेद्यासाठी किंवा कोणत्याही उपवासाच्या दिवशी नैवेद्यासाठी तुम्ही ही खीर बनवू शकतात. (How to make sevai kheer) काहीजण वर्षभरासाठी घरीच शेवया बनवू ठेवतात. तर काहीजण बाजारातून आणतात. घरी बनवलेल्या शेवया थोड्या जाड असतात. तर बाजारातील शेवया पातळ असतात. (How to make vermicelli kheer)
जर तुम्हाला खीर बनवायची असेल तर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या लांब, बारीक शेवयांची निवड करू शकता. शेवयांचा उपमा बनण्यासाठी जाड शेवया घेतल्या तरी चालतात. शेवयांची खीर बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Vermicelli kheer simple recipe)
शेवयांची खीर बनवण्याचं साहित्य
दूध - १ लिटर
शेवया - ७० ग्रॅम
साखर - १०० ग्रॅम
बदाम चिरलेले - ८ ते ९
मनुका - १०
तूप - २ टीस्पून
वेलची पावडर - ५
लवंग - २
कृती
१) शेवयांची खीर बनवण्यासाठी प्रथम कढई घेऊन त्यात दूध टाकून मंद आचेवर गरम करायला ठेवा. दूध पहिल्यांदा उकळायला लागल्यावर त्यात शेवया आणि लवंगा टाका.
२) चांगले उकळू द्या. शेवया आणि दुधाचे मिश्रण घट्ट होईपर्यंत ते उकळवा. ते घट्ट होण्यासाठी सुमारे 15 मिनिटे लागतील. दूध चांगले घट्ट झाल्यावर त्यात टाकलेल्या लवंगा बाहेर काढा.
चेहरा गोरा पण मान-पाठ खूपच काळपट दिसते? ४ उपाय, संपूर्ण शरीराचं टॅनिंग होईल दूर
३) आता खिरीमध्ये साखर घाला आणि पुन्हा एकदा मंद आचेवर उकळू द्या. खीर साधारण २ मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करा.
४) यानंतर खिरीमध्ये चिरलेले बदाम आणि बेदाणे घालून चांगले एकत्र करा. यानंतर अर्धा चमचा तूप आणि ठेचलेली वेलची घालून चांगले एकत्र करा. नंतर तुम्ही गरमागरम खीर सर्व्ह करू शकता.