दिवाळी (Diwali 2023) म्हटलं की लाडू, शंकरपाळे आलेच. अनेकांना चहा शंकरपाळे खायला खूप आवडतं. तर काहीजण नुसते शंकरपाळे खातात. विकतच्या शंकरपाळ्यांप्रमाणे घरी बनवलेले शंकरपाळे खुसखुशित बनत नाहीत, कडक होतात तर कधी जास्त सैल पीठ झाल्यामुळे भजीसारखे होतात. (How to Make Shankarpali Recipe) अशी अनेकांची तक्रार असते. विकतसारख्या परफेक्ट शंकरपाळे करणं एकदम सोपं आहे. यासाठी पीठ मळण्यापासून शंकरपाळे तळेपर्यंत काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.(Shankarpali Recipe in Marathi)
शंकरपाळे करण्याची सोपी पद्धत (How to make shankarpali in marathi)
१) सगळ्यात आधी अर्धा किलो मैदा पीठ चाळण्याच्या चाळणीने चाळून घ्या. पाऊण कप (१२५ ग्रॅम) तूप गरम करून घ्या. तूप गरम झालं की शंकरपाळ्यांच्या पिठात घाला. तूप गरम असल्यामळे आधी चमच्याच्या साहाय्याने हलवून मग पीठ हाताने एकजीव करा. तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता.
१ किलो भाजणीची खमंग चकली कशी करावी? पिठात 'हा' पदार्थ मिसळा; परफेक्ट बनेल चकली
२) गॅसवर भांडे ठेवून त्यात पाऊण कप (१२५ ग्रॅम) साखर घाला. यात पाऊण कप दूध घालून साखर वितळवून घ्या. तुम्ही यात पाणीसुद्धा घालू शकता. साखर वितळली जावी यासाठी सतत मिश्रण ढवळत राहा साखर वितळल्यानंतर गॅस बंद करा.
३) मैद्याच्या पीठात चिमूटभर मीठ, पाव चमचा वेलची पावडर घाला. यात आधी तयार करून घेतलेलं दूध- साखरेचं मिश्रण घाला. थोडं थोडं करून हे मिश्रण पिठात घालून पीठ मळून घ्या. पीठाचा गोळा जास्त सैल किंवा घट्ट असू नये. जर पीठ घट्ट झालं असेल तर त्यात दूध अजून घालू शकता. पीठ जास्त पातळ असेल तर शंकरपाळ्यांना पदर सुटत नाही.
४) या पीठाचा मध्यम आकाराचा गोळा तयार करून चपातीप्रमाणे जाडसर पोळी लाटून घ्या. ही पोळी जास्त पातळ लाटू नका अन्यथा शंकरपाळे कडक बनतात. पीठाचा गोळा जाडसर लाटल्यानंतर सुरीच्या किंवा कटरच्या साहाय्याने शंकरपाळी चौकोनी आकारात कट करून घ्या.
चपात्या वातड-कडक होतात, फुगत नाही? चपातीच्या पीठात मिसळा 'हा' पदार्थ; मऊ होतील चपात्या
५) कढईत तेल गरम करायला ठेवा तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर त्यात कढईत मावतील इतक्या शंकरपाळ्या घालून तळून घ्या. याच पद्धतीने इतर शंकरपाळेही तळून घ्या. थंड झाल्यानंतर शंकरपाळे हवाबंद डब्यात भरून ठेवून द्या.