Lokmat Sakhi >Food > तुपकट असतो म्हणून शिरा खाणं टाळता? घ्या थेंबभरही तूप न टाकता होणाऱ्या शिऱ्याची सोपी रेसिपी 

तुपकट असतो म्हणून शिरा खाणं टाळता? घ्या थेंबभरही तूप न टाकता होणाऱ्या शिऱ्याची सोपी रेसिपी 

Suji Halwa Without Ghee: शिरा खूप आवडतो पण तो तुपकट असतो म्हणून तुम्ही खात नसाल तर बिनातुपाचा शिरा कसा करायचा ते पाहा.(how to make halwa or sheera without ghee)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 12:46 PM2024-11-27T12:46:52+5:302024-11-27T12:48:10+5:30

Suji Halwa Without Ghee: शिरा खूप आवडतो पण तो तुपकट असतो म्हणून तुम्ही खात नसाल तर बिनातुपाचा शिरा कसा करायचा ते पाहा.(how to make halwa or sheera without ghee)

how to make sheera or suji halwa without ghee, how to make halwa without ghee, easy recipe of making ghee | तुपकट असतो म्हणून शिरा खाणं टाळता? घ्या थेंबभरही तूप न टाकता होणाऱ्या शिऱ्याची सोपी रेसिपी 

तुपकट असतो म्हणून शिरा खाणं टाळता? घ्या थेंबभरही तूप न टाकता होणाऱ्या शिऱ्याची सोपी रेसिपी 

Highlightsसाजूक तूप न घालताही अतिशय चवदार आणि पौष्टिक शिरा करता येतो. या पद्धतीने केलेल्या शिऱ्याचा आस्वाद एकदा नक्कीच घेऊन पाहा. 

साजूक तुपातला शिरा हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. पण हल्ली प्रत्येकजणच आपल्या वजनाबाबत, आरोग्याबाबत अधिक जागरुक झाला आहे. त्यामुळे तेल, तूप असे पदार्थ कमीतकमी प्रमाणात खाण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. आता आरोग्याच्या किंवा वजनवाढीच्या कारणामुळे तुम्हीही साजूक तूप घालून केलेला तुपकट शिरा खाणं टाळत असाल (how to make sheera or suji halwa without ghee?) तर अगदी थेंबभरही तूप न घालता शिरा कसा करायचा ते पाहा (how to make halwa without ghee)

तूप न घालता शिरा करण्याची रेसिपी 

 

साहित्य 

एक वाटी रवा

पाऊण वाटी काजू, बदाम, मनुका यांचे काप

दोन ते अडीच वाट्या पाणी किंवा दूध

लग्नसराईसाठी शिवा जाळीदार नेट ब्लाऊज, १० सुंदर पॅटर्न, साध्याच साडीलाही मिळेल स्टायलिश लूक

१ वाटी साखर किंवा गूळ

१ टीस्पून वेलचीपूड

७ ते ८ केशराच्या काड्या

 

कृती 

सगळ्यात आधी केशराच्या काही काड्या गरम पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत घालून ठेवा. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा.

कढई गरम झाली की त्यामध्ये रवा टाका आणि मध्यम आचेवर सोनेरी- लालसर होईपर्यंत खमंग भाजून घ्या. 

जेवढी साय पातेल्यात जमा केली तेवढंच तूप निघणार! भरपूर तूप निघण्यासाठी लक्षात ठेवा २ टिप्स 

यानंतर रवा व्यवस्थित भाजून झाला की त्यामध्येच सुकामेव्याचे तुकडे टाका आणि अर्ध्या मिनिटासाठी पुन्हा एकदा सगळे व्यवस्थित भाजून घ्या.

सुकामेवा आणि रवा छान भाजून झाला की त्यामध्ये गरम दूध किंवा पाणी टाका. पाणी किंवा दूध टाकताना ते खूप हळूहळू टाका आणि एकीकडे पाणी टाकत असताना दुसरीकडे चमच्याने कढईतलं मिश्रण हलवत ठेवा. यामुळे तुमच्या शिऱ्यामध्ये गाठी होणार नाहीत. 

 

पाणी- रवा व्यवस्थित आळून आल्यानंतर गूळ किंवा साखर घाला. याच वेळेस वेलची पूड आणि दुधात किंवा पाण्यात भिजत घातलेले केशर टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि कढईवर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या.

थंडीत व्यायाम करण्याचा कंटाळा येतो? ३ टिप्स- व्यायाम न करताही भराभर उतरेल वजन

साधारण २ ते ३ मिनिटांनी पुन्हा एकदा शिरा व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर गॅस बंद करा. साजूक तूप न घालताही अतिशय चवदार आणि पौष्टिक शिरा करता येतो. या पद्धतीने केलेल्या शिऱ्याचा आस्वाद एकदा नक्कीच घेऊन पाहा. 

 

Web Title: how to make sheera or suji halwa without ghee, how to make halwa without ghee, easy recipe of making ghee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.