Join us  

फक्त २ पदार्थ वापरून करा मऊ, खुसखुशीत शेंगदाणा चिक्की; जंक फूड खाण्यापेक्षा उत्तम पौष्टिक खाऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 3:56 PM

How to make Shengdana chikki : शेंगदाण्याची चिक्की विकत मिळतेच, पण घरीही झटपट करता येते.

हिवाळ्यात पौष्टीक लाडू अनेक घरांमध्ये बनवले जातात. वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. अशा स्थितीत रोजच्या आहारात काही उर्जा देणाऱ्या पौष्टीक पदार्थांचा समावेश केला तर तब्येत सुधारण्यास मदत होईल. शेंगदाणे प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत आहे. शेंगदाणे नुसते खाण्यापेक्षा चिक्की खाल्ल्यास अधिक चवदार लागेल.  (How to make shengdana chikki) शेगंदाण्याची, खमंग, खुसखुशित चिक्की बनवण्याची सोपी रेसेपी या लेखात पाहूया. (Shengdana Chikki Recipe)

 

शेंगदाणा चिक्की कशी बनवायची?

१) शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्या.  शेंगदाणे भाजल्यानंतर गॅस बंद करा

२) गुळाच्या खड्याचे लहान लहान तुकडे करा. 

३) एका कापडात शेंगदाणे घालून त्याची सालं काढून घ्या.

४) मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालून बारीक करून घ्या.

५) गॅसवर थोडं तूप घालून  गुळाचे खडे वितळण्यासाठी  ठेवा.

६) गुळ वितळण्यानंतर गॅस बंद करा आणि त्यात शेंगदाण्याचं कूट घाला.

७)  हे मिश्रण एकजीव करा. याचे गोळे तयार करून पातळ लाटून घ्या. तयार आहेत झटपट शेंगदाण्याची चिक्की 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न