Lokmat Sakhi >Food > गणपती विसर्जनाच्या नैवेद्यात शेवयाची खीर हवीच! परफेक्ट खिरीसाठी ५ टिप्स- खीर गचका होणार नाही

गणपती विसर्जनाच्या नैवेद्यात शेवयाची खीर हवीच! परफेक्ट खिरीसाठी ५ टिप्स- खीर गचका होणार नाही

How To Make Shevai Kheer: गणपती विसर्जनाच्या नैवेद्यासाठी मराठवाडा आणि इतर काही भागात शेवयाची खीर करण्याची परंपरा आहे. बघा खीर अगदी परफेक्ट जमून येण्यासाठी काय करावे (shevyachi kheer karnyachi recipe in marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2024 01:24 PM2024-09-16T13:24:24+5:302024-09-16T13:25:23+5:30

How To Make Shevai Kheer: गणपती विसर्जनाच्या नैवेद्यासाठी मराठवाडा आणि इतर काही भागात शेवयाची खीर करण्याची परंपरा आहे. बघा खीर अगदी परफेक्ट जमून येण्यासाठी काय करावे (shevyachi kheer karnyachi recipe in marathi)

how to make shevai kheer, shevyachi kheer karnyachi recipe in marathi | गणपती विसर्जनाच्या नैवेद्यात शेवयाची खीर हवीच! परफेक्ट खिरीसाठी ५ टिप्स- खीर गचका होणार नाही

गणपती विसर्जनाच्या नैवेद्यात शेवयाची खीर हवीच! परफेक्ट खिरीसाठी ५ टिप्स- खीर गचका होणार नाही

Highlightsशेवयाचे प्रमाण जास्त होऊन खीर गचकाही होणार नाही आणि कमी होऊन दुधातल्या शेवया शोधण्याची वेळही खवय्यांवर येणार नाही.

गणपती विसर्जनाची वेळ आता जवळ आली आहे. गणपतीच्या स्वागतासाठी जसे आपण मोदक करतो, तसेच काही पदार्थ असे असतात की जे गणपती विसर्जनाच्या दिवशी आवर्जून केले जातात. मराठवाडा आणि इतर काही भागांत गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपतीला शेवयाची खीर आणि करंजी या दोन पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. शेवयाची खीर हा तसा थोडा ट्रिकी पदार्थ (how to make shevai kheer?). कारण त्यातल्या शेवया आणि दूध यांचे प्रमाण अचूक जमायला हवे. त्यामुळेच शेवयाची खीर करण्याची ही रेसिपी एकदा पाहून घ्या. म्हणजे मग शेवयाचे प्रमाण जास्त होऊन खीर गचकाही होणार नाही आणि कमी होऊन दुधातल्या शेवया शोधण्याची वेळ खवय्यांवर येणार नाही.(shevyachi kheer karnyachi recipe in marathi)

 

शेवयाची खीर करण्याची रेसिपी

साहित्य

१ वाटी शेवया

४ वाट्या दूध 

तुम्ही जास्त प्रमाणात साखर खाता हे सांगणारी ८ लक्षणं, घरच्याघरी करा स्वत:चीच परीक्षा

१ चमचा साजूक तूप

२ टेबलस्पून सुकामेव्याचे तुकडे

१ वाटी साखर

१ टीस्पून वेलची पूड आणि जायफळ पूड 

६ ते ८ केशराच्या काड्या

 

कृती

सगळ्यात आधी दूध उकळायला ठेवा आणि काही वेळ उकळून ते थोडे आटू द्या. तसेच केशराच्या काड्या थोड्याशा दुधामध्ये भिजत घाला.

यानंतर एका पॅनमध्ये तूप टाका आणि त्यामध्ये शेवया टाकून त्या मंद आचेवर लालसर होईपर्यंत खमंग परतून घ्या.

गणपती विसर्जन: कपड्यांवरचे गुलालाचे डाग कसे काढायचे? २ सोप्या टिप्स- कपडे होतील चकाचक

यानंतर शेवया भिजतील एवढंच पाणी पॅनमध्ये टाका आणि झाकण ठेवून शेवया वाफवून घ्या.

यानंतर दूध थोडं आळून आलं असेल तर त्यात साखर, वेलचीपूड, केशर असं सगळं टाका.

सगळ्यात शेवटी वाफवून घेतलेल्या शेवया टाका आणि सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या. यानंतर ४ ते ५ मिनिटे गॅस सुरू ठेवा आणि त्यानंतर बंद करा. गरमागरम खीर झाली तयार.

शेवयाची खीर करताना दूध थोडे जास्त ठेवावे. कारण काही वेळाने शेवयांमध्ये दूध शोषले जाते आणि ते कमी होत जाते. 
 

 

Web Title: how to make shevai kheer, shevyachi kheer karnyachi recipe in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.