गुढीपाडव्याचा सण आता अवघ्या २ दिवसांवर आला आहे. त्यामुळे घरोघरी गुढीपाडवा स्पेशल पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. आता गुढीपाडव्याला बहुतांश घरांमध्ये जो पारंपरिक बेत केला जातो, तो असतो श्रीखंडाचा (Gudhi padva special kesar elaichi flavour shrikhand). श्रीखंड करायचं म्हणजे मग बऱ्याच घरांमध्ये चक्का करण्यासाठी आदल्या दिवशी रात्रीच दही कापडात बांधून ठेवलं जातं. किंवा मग गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच उठून दही चक्का करण्यासाठी ठेवलं जातं. कारण दह्याचा चक्का होण्यासाठी ५ ते ६ तास लागतात, असं आपल्याला वाटतं (How to make shrikhand in 5 minutes). तुम्हालाही तसंच वाटत असेल तर हे काम झटपट करून अवघ्या ५ मिनिटांत श्रीखंड कसं तयार करायचं ते बघाच... (instant shrikhand recipe)
श्रीखंड तयार करण्याची इन्स्टंट रेसिपी
अगदी झटपट म्हणजेच मोजक्या ४ ते ५ मिनिटांमध्ये श्रीखंड कसं तयार करायचं, याची रेसिपी तरला दलाल यांनी युट्यूबवर शेअर केली आहे.
भर उन्हाळ्यातही घर राहील थंडगार! बघा महागडा एसी न घेताही घर कसं ठेवायचं गारेगार
यात त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला जेवढ्या दह्याचं श्रीखंड करायचं आहे, तेवढं दही एका सुती कपड्यात अगदी घट्ट बांधून घ्या. त्यानंतर हाताने दाबून दाबून त्या दह्यातलं सगळं पाणी काढून टाका. अशा पद्धतीने दह्यातलं सगळं पाणी काढून टाकण्यासाठी तुम्हाला अवघे २ ते ३ मिनिटे लागतील.
वरची स्टेप करण्यापुर्वी सगळ्यात आधी एक ते दोन टेबलस्पून पाणी वाटीमध्ये चांगलं गरम करून घ्या आणि त्यामध्ये ७ ते ८ केशराच्या काड्या टाकून ठेवा.
आता आपण तयार केलेला चक्का एका भांड्यात काढा. त्यामध्ये पिठीसाखर घाला. पिठी साखर घातल्याने श्रीखंड आणखी झटपट होतं. त्यातच केशराचं पाणी आणि वेलची पावडर टाका.
गुढीपाडवा विशेष: मराठी नववर्षाची सुरुवात गोड करणारे ६ पारंपरिक पदार्थ; यातला तुमच्या आवडीचा कोणता?
व्हिस्कच्या साहाय्याने सगळं मिश्रण हलवून घेतलं की घरच्याघरी अगदी झटपट केशर- वेलची फ्लेवरचं इन्स्टंट श्रीखंड झालं तयार. यावर्षी पाडव्याला या रेसिपीने श्रीखंड करून पाहा.