Join us  

१ वाटी शेव वापरून घरीच करा स्वादीष्ट मिठाई; सोपी रेसिपी- नैवेद्य झटपट होईल तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 3:17 PM

How to make sev barfi at home : शेव आपल्या सर्वांच्याच घरी असते. कारण चहाबरोबर स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी, चाट आयटम्स बनवण्यासाठी शेवेचा वापर केला जातो.

श्रावणात नैवेद्यासाठी आणि उपवास सोडताना ताटात वाढण्यासाठी गोड पदार्थ हमखास बनवले जातात. मोठ्या सण-उत्सवांच्या दिवशी नैवेद्याचे फार महत्व असते. अशावेळी नेहमी शीरा, खीर, हलवा असे पदार्थ बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवलं तर नैवेद्य उत्तम तयार होईल आणि खाणारेही आवडीने खातील. (Sev Barfi Recipe) घरी बनवलेल्या मिठाईचा प्लस पॉईंटस असा की तुम्ही आवडीनुसार साखर किंवा गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा शुगर फ्री मिठाईसुद्धा बनवू शकता (Easy and quick sev barfi recipe at home)

शेव आपल्या सर्वांच्याच घरी असते. कारण चहाबरोबर स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी, चाट आयटम्स बनवण्यासाठी शेवेचा वापर केला जातो. ४० ते ५० रूपयांची  शेव वापरून तुम्ही चवदार मिठाई अगदी सोप्या पद्धतीनं घरीच बनवू शकता. (Shev Barfi Recipe) ही मिठाई बनवण्यासाठी तुम्हाला फार काही करावे लागणार नाही. फक्त खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. (How to make shev barfi)

१) शेव बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत तूप आणि खवा मिसळा आणि चांगला परतून घ्या. त्यानंतर रूम टेम्परेचरवर असलेलं दूध आणि साखर त्यात घाला. मावा आणि साखर एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिसळा. त्यात एक चिमुट केशर आणि वेलची पावडर घाला. व्यवस्थित मिक्स करा 

२) त्यानंतर त्यात २ वाट्या मीठ नसलेली शेव घाला. शेवई मिक्स केल्यानंतर त्यात पुन्हा मावा घाला. मग पाणी घालून व्यवस्थित  एकजीव करा. शेव खव्याच्या मिश्रणात एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करा. 

३) एका ताटाला तेल लावून त्यात शेव घाला. शेव व्यवस्थित पसरवल्यानंतर त्यावर बदामाचे बारीक काप घाला आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा. त्यावर चांदीचा वर्ख लावून छान  मिठाईचे तुकडे तयार करून घ्या. तयार आहे स्वादीष्ट शेव बर्फी

कुरकुरीत, खमंग शेव घरीच कशी बनवावी?

जर तुम्हाला शेव बाजारातून आणायची नसेल तर तुम्ही घरच्याघरी सुद्धा शेव बनवू शकता यासाठी शेव बनवण्याच्या काही सोप्या स्टेप्स पाहूया. बेसनाची शेव बनवण्यासाठी सगळ्यात आधी बेसन चाळून घ्या. त्यात तेल, लाल तिखट, हळद, हिंग, बेकींग सोडा, ओवा आणि चवीनुसार मीठ घालून पीठ मळून घ्या.

त्यानंतर शेव बनवण्याच्या साच्यामध्ये हा गोळा घाला. मोठ्या जाळीची किंवा लहान  जाळीची निवड करून साचा घट्ट बंद करून घ्या. कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात हळूहळू साच्यातून शेव खाली पाडा. शेव गोल्डन होईपर्यंत तळल्यानंतर बाहेर काढा. शेव जास्त काळपट होऊ देऊ नका अन्यथा चवसुद्धा जळल्याप्रमाणे लागेल. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स