Join us  

उरलेल्या इडलीची करा चिली इडली, पदार्थ देशी - चव चटपटीत चायनीज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 4:45 PM

How To Make Spicy Chilli Idli At Home : इडल्या केल्या, जास्त उरल्या आता नेमके त्याचे काय करावे ? बनवा एक खास झणझणीत चायनीज पदार्थ...

मऊ, लुसलुशीत, टम्म फुगलेली इडली खाण्याची मजा काही वेगळीच असते. इडली हा असा पदार्थ आहे की जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. बरेचजण सकाळच्या नाश्त्याला इडली, डोसा असे पदार्थ आवडीने खातात. इडली केल्या केल्या ती गरमागरम इडली चटणी व सांबारसोबत खायला आपल्याला आवडते. इडली केल्यावर ती तेव्हाच्या तेव्हा सगळी खाऊन फस्त केली जाते. क्वचितच अशी वेळ येते की इडली बनवली आहे व ती उरली आहे. परंतु या उरलेल्या इडलीचे नेमके करायचे काय असा प्रश्न पडतो. या उरलेल्या इडलीपासून आपण झटपट तयार होणारा एखादा चटपटीत चायनीज पदार्थ बनवू शकतो. 

सध्या चायनीज पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. विशेषतः चायनीज फ्राईड राईस किंवा नूडल्स अनेकांना खूप आवडतात. त्याचसोबत चायनीज स्टार्टर्स आणि सूपही पिणे अनेकांना आवडते. चायनीज पदार्थ बनवणे तितकेसे अवघड नसते. याचबरोबर अजून एक गोष्ट ती म्हणजे घरच्या घरी आणि स्वच्छ वातावरणात केलेले चायनीज आरोग्यासाठी कमी हानिकारक असते. उरलेल्या इडली पासून आपण झटपट घरच्या घरी चिली इडली हा चटपटीत चायनीज पदार्थ बनवू शकतो. चिली इडली बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How To Make Simple Homemade Indo Chinese Chilli Idlis With Leftover Idlis At Home).   

साहित्य :- 

१. उरलेल्या किंवा ताज्या इडल्या - ६ ते ७ (बारीक तुकडे करून घेतलेल्या)२. तेल - ६ ते ७ टेबलस्पून ३. लसूण पाकळ्या - १२ ते १५ ४. हिरव्या मिरच्या - २ (उभ्या चिरून घेतलेल्या)५. सुक्या मिरच्या - ३ ६. कांदे - २ लहान (डाइसच्या आकारात कापून घेतलेले)७. ढोबळी मिरची - १ (डाइसच्या आकारात कापून घेतलेली)८. साखर - १ टेबलस्पून ९. सोया सॉस - १ टेबलस्पून १०. चिली सॉस - १ टेबलस्पून ११. टोमॅटो केचप - १ टेबलस्पून १२. व्हिनेगर - १ टेबलस्पून १३. कॉर्न फ्लॉवर स्लरी - १/४ कप १४. पाणी - २ ते ३ १५. कांद्याची पात - १ कप (बारीक चिरून घेतलेली)

मस्त- खमंग- खुसखुशीत धपाटे एकदा खाऊन तर पहा! मराठवाड्याची खास पारंपरिक डिश, शाळेच्या डब्यासाठी परफेक्ट...

उडपीस्टाइल परफेक्ट डोसा होण्यासाठी पिठात घाला १ गोष्ट, युक्ती छोटी पण डोसा भारी...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका इडलीचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावे. त्यानंतर या इडलीचे कापलेले तुकडे तेलात तळून डिप फ्राय करून घ्यावेत. २. इडल्या छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्याव्यात. ३. आता एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या तसेच सुक्या मिरच्या घालाव्यात.   ४. त्यानंतर या मिश्रणात डाइसच्या आकारात कापलेला कांदा व ढोबळी मिरची घालावी. त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालावे. ५. आता या भाज्यांच्या मिश्रणात सोया सॉस, साखर, टोमॅटो केचप, चिली सॉस, व्हिनेगर घालून घ्यावे. 

फक्त ३ पदार्थ वापरुन आता कॅफे स्टाईल नाचोस बनवा घरीच! क्रिस्पी कुरकुरीत नाचोसची सोपी कृती...

१० मिनिटांत डाळ वडा, इन्स्टंट नाही तर परफेक्ट साऊथ इंडियन! कसा?- ही घ्या सोपी ट्रिक...

६. त्यानंतर या मिश्रणात कॉर्न फ्लॉवर स्लरी मिसळून घ्यावी. ७. सगळ्यात शेवटी यात २ ते ३ कप पाणी घालून हे सगळे मिश्रण ढवळून घ्यावे.८. आत २ ते ३ मिनिटे हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्यावे, त्यानंतर यात तळून घेतलेल्या इडल्या घालाव्यात. ९. ही चिली इडली तयार झाल्यानंतर सर्वात शेवटी त्यावर बारीक कापलेली कांद्याची पात भुरभुरवून घालावी. 

आता ही तयार झालेली चिली इडली खाण्यासाठी गरमागरम सर्व्ह करावी.

टॅग्स :अन्नपाककृती