Join us  

ना गॅस-ना तेल, ५ मिनिटात धुराचा कांदा करण्याची सोपी कृती, तोंडी लावण्यासाठी ताटात हवीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 11:46 AM

How to make Smoked Onions at home in 5 Minutes-Check out unique Recipe : एक कांदा घ्या अन् झणझणीत धुराचा कांदा तयार करा, पाहा भन्नाट रेसिपी

अनेक घरात फोडणीसाठी खास कांद्याचा (Onion) वापर होतो. कांद्याच्या फोडणीमुळे पदार्थाची चव वाढते. काही जण कांद्याची भाजी, चटणी किंवा भजी तयार करतात. तर काही लोकं तोंडी लावण्यासाठी बऱ्याच पदार्थांसोबत कच्चा कांदा खातात. कांद्याची चटणी आपण खाल्लीच आहे. शिवाय ढाबास्टाईल लच्छा कांदा देखील तयार करून खाल्लं असेल. पण आपण कधी धुराचा कांदा करून पाहिलंय का?

कांदा चिरताना त्यातून वायू बाहेर पडते. ज्यामुळे डोळ्यातून पाणी येतेच. पण धुराचा कांदा हा नवा प्रकार काय? (Cooking Tips) असा विचार तुम्ही करत असाल तर, एकदा ही रेसिपी पाहा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल, शिवाय कमी साहित्यात तयार होते(How to make Smoked Onions at home in 5 Minutes-Check out unique Recipe).

धुराचा कांदा करण्यासाठी लागणारं साहित्य

कांदा

लिंबाचा रस

लाल तिखट

धणे पूड

कोथिंबीर

ना पोळपाट ना लाटणं, वाटीने करा एकावेळी दोन गोल पोळ्या एकदम झटपट

मीठ

कृती

सर्वप्रथम, २ कांदे उभे चिरून घ्या. चिरलेल्या कांद्याच्या पाकळ्या मोकळे करा. चिरलेला कांदा एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धणे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून हाताने मिक्स करा.

भोगीला तीळ लावून बाजरीची भाकरी करताना लक्षात ठेवा २ टिप्स, भाकरी वातड होणार नाहीत

कांद्याला मसाले लागल्यानंतर त्याला दम द्या. बाऊलच्या मधोमध एक छोटी वाटी ठेवा. वाटीमध्ये एक कोळशाचा तुकडा ठेवा. त्यावर एक चमचा तूप घालून लगेच झाकण ठेवा. यामुळे कोळशाच्या धुरामुळे कांद्याची चव आणखीन वाढेल. २ मिनिटानंतर झाकण बाजूला काढून ठेवा. अशा प्रकारे धुराचा कांदा खाण्यासाठी रेडी. भात असो किंवा चपाती जेवणात जर धुराचा कांदा असेल तर, नक्कीच जेवणाची रंगत वाढेल. 

टॅग्स :कांदाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न