गोल-गोल फुललेल्या मऊ चपात्या बनवणं अनेकांना कठीण वाटतं. अनेक घरांमध्ये चपात्या व्यवस्थित न झाल्यामुळे महिलांना बोलणी ऐकावी लागतात. चपात्या आहेत की पापड, चपाती केलीये की भारताचा नकाशा अशी अनेकांची तक्रार असते. (How To Make Chapati In Easy Way) रोज उठून चपात्या करणं हे खूपच किचकट काम आहे. चपाती परफेक्ट होण्यासाठी तुम्ही एका हातानं चपाती बनवू शकता. या चपात्या करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत लागणार नाही. (How To Make Soft And Fluffy Roti And Chapati With One Hand)
चपाती करण्यासाठी दोन्ही हातांचा वापर केला जातो. पण एका हातानं चपाती बनवणं कठीण नाही. जर तुमचा हात फॅक्चर झाला असेल आणि घरात चपाती करणारं कोणीही नसेल तर तर तुम्ही हातानं चपाती करण्याची एक सोपी ट्रिक वापरू शकता सोशल मीडियावर ही व्हायरल ट्रिक वापरून तुम्ही चपात्या बनवू शकता.
न लाटता, न पीठ मळता मऊ चपात्या कशा कराव्यात?
या व्हायरल ट्रिकच्या एकानुसार हातानं चपाती करण्यासाठी तुम्हाला नेहमी चपाती करण्यासाठी जे साहित्य लागतं त्याची आवश्यकता असेल. चवीनुसार मीठ आणि पाणी तुम्ही यात घालू शकता तुम्हाला यात तेलाची गरज लागली तर तुम्ही तेलही घालू शकता. तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत ते पाहून तुम्ही चपातीच्या पिठाचे प्रमाण ठरवा.
ही ट्रिक वापरण्याासाठी तुम्हाला पीठ मळण्याची काही गरज नाही. एका बाऊलमध्ये पीठ घ्या, त्यात चमचाभर मीठ आणि तेल घाला. नंतर हळूहळू पाणी घालत हे पीठ व्यवस्थित मिसळून घ्या. असं केल्यानं मिश्रण जास्त पातळ होईल. या पद्धतीनं तुम्ही डोसा बनवू शकता.
प्रोटीनचे पॉवरहाऊस आहेत २ पदार्थ; रोज सकाळी १ मूठभर खा, मसल्स-हाडं होतील मजबूत
हे काम एका हातानं आरामात करू शकता. पीठाचं मिश्रण तयार केल्यानंतर चपाती करण्यासाठी गॅसवर तवा ठेवा. चमच्याच्या मदतीने पीठ तव्यावर गोलाकार पसरवून घ्या. एका बाजूनं शेकल्यानंतर चपाती दुसऱ्या बाजूनं शेकून घ्या.