गरमागरम मऊ चपात्या (Chapati) ताटात वाढल्या तर जेवणाची चव दुप्पट होते आणि अशा चपात्या खाण्याचाही आनंद वेगळाच असतो. चपाती गरम असल्यानंतर नरम असते. चपात्या थंड झाल्यानंतर वातड होतात. तर काही जणांच्या चपात्या फुलतही नाहीत अशावेळी चपात्या खाण्याची इच्छा होत नाही कारण त्या खूपच कडक होतात. (How To Make Soft And Fluffy Roti In Home) चपाती परफेक्ट होण्यासाठी काही खास युक्त्या माहित असाव्या लागतात. या युक्त्या माहित असतील तर तुम्ही आरामात मऊसूत चपात्या बनवू शकता. (How To Make Perfect Soft Chapati)
संधिया कुकबुकच्या रिपोर्टनुसार सर्व प्रथम गव्हाचे पीठ बारीक दळलेलं असेल याची खात्री करा. कणीक मऊ आणि लवचीक असावी पण चिकट नसावी. मऊ चपात्या होण्यासाठी तवा गरम असायला हवा आणि चपाती दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या जवळपास २ मिनिटांनी चपाती उत्तम शिजवून होईल. तव्यावर जास्तवेळ ठेवल्यास चपाती कडक होते.
चपातीचे पीठ मळताना त्यात १ चमचा तूप किंवा दूध मिसळ्याने चपात्या फुलून गोल तयार होतात. याशिवाय चपाती मऊ राहते. ही ट्रिक वापरल्यास चपाती मऊ मुलायम होते. काहीजण फक्त पाणी घालून चपातीचं पीठ मळतात ते खूपच चुकीचं आहे.
वजन वाढलंय-व्यायामानेही कमी होईना? आहारतज्ज्ञ सांगतात २१ दिवसांत ४ किलो घटवण्याचं खास डाएट
अनेकदा चपातीच्या पिठात फक्त पाणी मिसळून पीठ मळलं जातं. पण तुम्हाला मऊ चपात्या करायच्या असतील तर पीठ व्यवस्थित मळा. पीठात पाण्याबरोबरच तूप घालून १ ते २ मिनिटं व्यवस्थित मळून घ्या. ज्यामुळे पीठ मऊ-मुलायम राहील.
चपातीचे पीठ मळल्यानंतर लगेच चपाती करू नका. चपातीचं पीठ मळल्यानंतर १० ते १५ मिनिटं आराम द्या. त्यानंतर चपातीच्या पिठाला तेलाचा हात लावा. नंतर हे पीठ १० मिनिटांसाठी झाकून ठेवून द्या. या पद्धतीने चपाती केल्यास चपात्या मऊ, फुगलेल्या बनतील. याशिवाय चपातीचं पीठ करताना एकत्र पाणी घालू नका.
३२ दातांचा पिवळेवणा हटवतील 'ही' पानं; रोज १ पानं चावून घ्या, चमकतील दात-दुर्गंधीही टळेल
हळूहळू गरजेनुसार पिठात पाणी घालत राहा. या पद्धतीने पीठ मळल्यास चपात्या छान फुलतील. तुम्ही चपाती दुधाबरोबरही खाऊ शकता. जेव्हा चपातीचं पीठ दुधासोबत मळाल तेव्हा गरम पाण्याचा वापर करा. पीठ मळल्यानंतर त्यावर हलकं तूप लावा. १० मिनिटांसाठी तसंच सोडून नंतर चपात्या लाटा.