मऊ, लुसलुशीत फुललेला पिवळा धम्मक ढोकळा खाणं सगळ्यांचं आवडत. ढोकळा चवीला जितका सुंदर लागतो तितकाच तो फुलून आला तर खायला देखील मजा येते. ढोकळा हा एक असा पदार्थ आहे जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. ढोकळा हा प्रामुख्याने गुजरात प्रांतांतील एक मुख्य पदार्थ आहे. परंतु आता हा गुजराती खमण ढोकळा आजकाल सहजपणे कोणत्याही दुकानात खाण्यासाठी सहज मिळतो. सध्या कोणत्याही सण, समारंभ, पार्टीमध्ये किंवा जेवणाच्या थाळीत साईड डिश म्हणून ढोकळा हा प्रकार असतोच. ढोकळा जितका फुलून मऊ, जाळीदार होतो तितकाच तो दिसायला आणि खायला अतिशय सुंदर लागतो.
ढोकळ्याचे अनेक प्रकार आपण आतापर्यंत खाल्ले असतील. बेसनाच्या पिठाचा तसेच तांदूळ व उडीद डाळीच्या पिठापासून असे अनेक प्रकारचे आणि चवीचे ढोकळे बनवले जातात. आपण बरेचदा संध्याकाळच्या चहासोबत नाश्त्याला ढोकळा खाणे पसंत करतो. हा ढोकळा आपण काहीवेळा बाजारांतून विकत आणतो किंवा काही गृहिणी घरी देखील ढोकळा बनवतात. जेव्हा आपण घरी ढोकळा बनवतो तेव्हा तो विकतसारखा मऊ, लुसलुशीत, आणि जाळीदार झाला तरच तो खाण्यात मजा येते. परंतु काहीवेळा ढोकळा बनवण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे आपला ढोकळा फसतो किंवा मनासारखा होत नाही. अशावेळी ढोकळा मनासारखा न फुलता फसला तर हिरमोड होतो, आणि सगळ्या मेहेनतीवर पाणी फेरल्यासारखे होते. त्यामुळे ढोकळा बनवताना तो साचांगला फुलून यावा यासाठी आपण करत असलेल्या नेहमीच्या चुका टाळून ढोकळा कसा मऊ व जाळीदार बनवता येईल, ते पाहूयात(How To Make Dhokla Spongy And Fluffy At Home).
ढोकळा फुलून येण्यासाठी त्यात सोडा नेमका कधी घालावा ?
१. ढोकळा बनवताना तो फुलून येण्यासाठी आपण त्यात बहुतेकदा सोडा घालतो. सोडा घातल्यामुळे ढोकळा अधिक जाळीदार आणि फुलून येण्यास मदत होते. परंतु काहीवेळा आपण सोडा घालताना काही चुका करतो किंवा चुकीच्या वेळी मिश्रणात सोडा घालतो, यामुळे काहीवेळा सोडा घालूनही ढोकळा फुलून येत नाही. अशावेळी अनेक गृहिणींना प्रश्न पडतो की सोडा घालूनही ढोकळा परफेक्ट फुलून का येत नाही.
२. सर्वप्रथम ढोकळा वाफेवर शिजवून घेण्यासाठी स्टिमरमध्ये पाणी ओतून ते पाणी चांगले गरम करून हलके उकळवून घ्यावे. स्टीमरमध्ये पाणी उकळेपर्यंत ढोकळ्याच्या तयार बॅटरमध्ये, एक टेबलस्पून सोडा घालावा. सोडा घातल्यावर त्यावर २ टेबलस्पून पाणी घालून तो सोडा अॅक्टिव्ह करून घ्यावा. आता हा सोडा त्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये व्यवस्थित चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावा. ढवळून झाल्यानंतर सोडा अॅक्टिव्ह असतानाच पटकन ते बॅटर गरम पाण्याने भरलेल्या स्टिमरमध्ये शिजण्यासाठी ठेवून द्यावे.
शिळा भात खायचा नाही, फोडणीच्या भाताचा कंटाळा आला? करा खमंग झटपट ‘भात वडा’!-चवीला जबरदस्त...
आता चिकाच्या दुधाशिवाय बनवा तितक्याच सुंदर चवीचा खरवस...खरवसाची जिभेवर रेंगाळणारी चव...
३. ढोकळा बनवताना आपली चूक होते ती सोडा घालण्याच्या पद्धतीमध्ये. आपण ढोकळ्याच्या बॅटरमध्ये, सर्वात आधी सोडा घालतो आणि त्यानंतर ढोकळा शिजवण्यासाठी आपण स्टिमरमध्ये पाणी गरम करायला ठेवतो. मग ढोकळ्याच्या बॅटर मधील सोडा लगेच इनॅक्टिव्ह होतो, आणि असा इनॅक्टिव्ह झालेला सोडा असलेले बॅटर आपण स्टिमर मधील पाण्यांत ठेवतो. तोपर्यंत सोडा इनॅक्टिव्ह झालेला असतो, यामुळेच ढोकळ्याच्या बॅटर मध्ये सोडा घालूनही ढोकळा काहीवेळा फुलून येत नाही.
इडली मऊ लुसलुशीत होण्यासाठी पीठ भिजवताना घाला फक्त १ गोष्ट; इडली फुगेल टम्म...