Join us  

घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2023 8:35 PM

Instant Khaman Dhokla Premix Recipe : घरचा ढोकळा बाहेरच्या ढोकळ्यासारखा होतच नाही असं म्हणता, हे प्रिमिक्स वापरुन पाहा.

मऊ, लुसलुशीत फुललेला पिवळा धम्मक ढोकळा खाणं सगळ्यांचं आवडत. ढोकळा चवीला जितका सुंदर लागतो तितकाच तो फुलून आला तर खायला देखील मजा येते. ढोकळा हा एक असा पदार्थ आहे जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. ढोकळा हा प्रामुख्याने गुजरात प्रांतांतील एक मुख्य पदार्थ आहे. परंतु आता हा गुजराती खमण ढोकळा आजकाल सहजपणे कोणत्याही दुकानात खाण्यासाठी सहज मिळतो.

हा ढोकळा आपण काहीवेळा बाजारांतून विकत आणतो किंवा काही गृहिणी घरी देखील ढोकळा बनवतात. जेव्हा आपण घरी ढोकळा बनवतो तेव्हा तो विकतसारखा मऊ, लुसलुशीत, आणि जाळीदार झाला तरच तो खाण्यात मजा येते. परंतु काहीवेळा ढोकळा बनवण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे आपला ढोकळा फसतो किंवा मनासारखा होत नाही. यासाठीच विकतसारखा मऊ, लुसलुशीत ढोकळा तयार करण्यासाठी आता त्याचे प्रिमिक्स देखील झटपट बनवा घरच्या घरीच. या प्रिमिक्स पासून ढोकळा बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How to make Soft and Spongy Instant Khaman Dhokla Premix). 

साहित्य :- 

१. बेसन - १५० ग्रॅम (चाळून घेतलेलं)२. बारीक रवा - १ टेबलस्पून ३. साखर - १ टेबलस्पून ४. सिट्रिक ऍसिड - १/२ टेबलस्पून ५. इनो - १ टेबलस्पून ६. मीठ - १/४ टेबलस्पून ७. तेल - २ ते ३ टेबलस्पून 

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यावे. २. या चाळून घेतलेल्या बेसन पिठात १ टेबलस्पून रवा घालावा. ३. त्यानंतर त्यात साखर, सिट्रिक ऍसिड, इनो व चवीनुसार मीठ घालावे. ४. आता चमच्याच्या मदतीने हे ढोकळ्याचे प्रिमिक्स ढळवून एकजीव करून घ्यावे. 

ढोकळ्याचे प्रिमिक्स तयार आहे. हे प्रिमिक्स आपण एका हवाबंद काचेच्या बरणीत व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता. 

घरच्याघरी १० मिनिटांत चहा मसाला करण्याची सोपी कृती, पावसाळ्यात ‘मसाला चाय’ प्या मनसोक्त...

या प्रिमिक्स पासून ढोकळा तयार करण्याची सोपी पद्धत:- 

१. एक गोल पसरट भांडे घेऊन त्यात थोडेसे तेल घालून ते तेल संपूर्ण भांड्याला लागेल असे पसरवून घ्या. २. त्यानंतर आपण तयार केलेले ढोकळा प्रिमिक्स एक कप घेऊन त्यात २ टेबलस्पून तेल ओतून घ्यावे. ३. आता एक कप प्रिमिक्स घेतल्यास त्यात एक कप पाणी घालून हे प्रिमिक्स भिजवून घ्यावे. ४. त्यानंतर हे प्रिमिक्स चमच्याने ढवळून घ्यावे. ढवळत असताना हे प्रिमिक्स हळूहळू फुलून येईल.

ढोकळा हवा तसा मनासारखा फुलून येत नाही ? सोडा घालण्याची पद्धत तर चुकत नाही ना...

 

साजूक तूप करण्यासाठी साय साठवण्याच्या ५ सोप्या टिप्स, तूप होईल शुभ्र- रवाळ...

५. आता गोल पसरट भांड्याला तेल लावून घेतले आहे या भांड्यात हे प्रिमिक्स बॅटर ओतून घ्यावे. बॅटर डब्यांत ओतून घेतल्यानंतर डबा थोडा हलकासा हलवावा जेणेकरून त्यातील हवा बाहेर निघून जाईल. ६. त्यानंतर ढोकळा वाफवण्यासाठी १५ मिनिटे स्टिमर मध्ये ठेवून द्यावा. ७. ढोकळ्याच्या फोडणीसाठी तेल घेऊन त्यात राई, हिंग, किंचित पाणी, चवीनुसार साखर व मीठ घालून घ्यावे. ८. आता ही फोडणी तयार ढोकळ्यावर घालून घ्यावी. 

आता घरगुती प्रिमिक्स पासून तयार केलेला ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. ढोकळा सर्व्ह करताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व किसलेल खोबर घालून सर्व्ह करावा.

टॅग्स :अन्नपाककृती