सकाळच्या नाश्त्यात अनेकदा आपण बेसनाचा पोळा खातो. इतकेच नाही तर दुपारच्या जेवणातही चपातीसोबत हा पोळा खाल्ला जातो. (how to make soft besan chilla) बेसनाचा पोळा हा आरोग्यासाठी अधिक चांगला मानला गेला आहे. यामध्ये प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण जास्त असते. चविष्ट बेसनाचा पोळी अगदी कमी वेळेत आणि कमी तेलात केला जातो. (easy besan chilla recipe)
मुलांच्या टिफिनमध्ये सहज आपण पटकन देता येणारा पदार्थ बेसनाचा पोळा. अनेकदा हा पोळा तयार करताना तो कडक होतो.(healthy Indian breakfast recipe) ज्यामुळे अधिक वेळा तो चावावा लागतो. बरेचदा यामुळे तो घशात देखील अडकतो.(soft gram flour pancake) परंतु, आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. बेसनाच्या पीठात एक पदार्थ मिसळल्याने मऊ- लूसलुशीत पोळा तयार होईल. या सोप्या टिप्स पाहूया.
ज्वारीचा चीक कधी खाल्ला आहे, पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी-ज्वारीच्या चिकाचे पापड, फुलतात दुप्पट
1. बेसनाच्या पोळ्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते. वजन कमी करण्यासाठी किंवा डाएटमध्ये आपण रोज खाऊ शकतो. तसेच यामुळे पचनक्रिया, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. बेसनमध्ये ग्लुटेन नसल्यामुळे मधुमेहासाठी चांगले आहे. रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहण्यास मदत होते.
2. बेसनाचा पोळा मऊ बनवण्यासाठी पीठ तयार करताना आपल्या काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. यासाठी बेसनाचे मिश्रण तयार करताना ते मऊ किंवा कडक होऊ शकते.
3. बेसन पोळा मऊ करण्यासाठी बेसनात पाणी घालून ते विरघळण्यासाठी १ तास बाजूला ठेवा. बेसन मिसळताना १ चमचा दही घाला. दही हे शक्यतो ताजे असायला हवे. तसेच पिठाच्या मिश्रणात चमचाभर तेलही घाला.
सोडा- इनो न वापरता तासाभरात करा डाळ-तांदळाचा कुरकुरीत डोसा, सोप्या टिप्स-तव्याला चिकटणार नाही
4. आपण किती प्रमाणात बेसन पोळा बनवणार आहोत त्यानुसार दही आणि तेलाचे प्रमाण ठरवा. यामध्ये चवीनुसार मीठ, हिंग, हळद, कोथिंबीर, लाल तिखट घाला.
5. सर्व साहित्य बेसनात फेटून त्यात पाणी घालून गुळगुळीत पीठ तयार करा. यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची देखील घालू शकता. मिश्रण फार घट्ट किंवा पातळ नसायला हवे. १० ते १५ मिनिटे मिश्रण ठेवून द्या, मध्ये मध्ये २ ते ३ वेळा फेटून घ्या.
6. पॅन गरम करुन त्यावर हलके तेल लावा. बेसनाचे मिश्रण घेऊन हलक्या हाताने ते तव्यावर पसरवा. पोळा जास्त जाड आणि पातळ नसावा याची काळजी घ्याल. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीने तयार होईल मऊ-लूसलुशीत बेसनाचा पोळा