सर्वांच्याच घरी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणसाठी रोज चपात्या बनवल्या जातात. अनेक घरांमध्ये दुधापेक्षा पांढऱ्याशुभ्र आणि मऊ चपात्या बनवल्या जातात. (How to Make Soft Chapati) पण प्रत्येकाच्याच घरी चपात्या वेगवेगळ्या असतात. अनेकदा प्रयत्नही करूनही चपाती मऊ होत नाही. चपात्या मऊसूत होण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स फॉलो केल्या तर जेवणाची चव अधिकच वाढेल आणि चपात्या कडक किंवा वातड होणार नाहीत. (Cooking Tips How to Make Roti) चपाती, मऊ व्हावी यासाठी तुम्ही चपातीचं पीठ कसं मळता हे फार महत्वाचे असते. या पद्धतीने पीठ मळल्यास चपात्या मऊ राहतील आणि कणीक काळी पडणार नाही. (How to Make Soft Chapati)
१) चपाती बनवण्याासाठी सगळ्यात आधी गव्हाचे पीठ चाळून घ्या. एक मोठा मिक्सिंग बाऊल घेऊन त्यात एक वाटी गव्हाचे पीठ चाळून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये एक वाटी मैदा घाला दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्या
२) पीठात एक चमचा तेल आणि चुटकीभर मीठ घालून पुन्हा मिसळून घ्या. नंतर कोमट दूधात थोडं पीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. पीठ जास्त सॉफ्ट, स्मूद असेल याची काळजी घ्या. (What is the secret to making soft chapatis)
पोटाच्या टायर्समुळे अख्खं शरीर बेढब झालंय? ५ दिवस ५ गोष्टी करा, आपोआप सपाट होईल पोट
३) तुम्ही चपातीचे पीठ मळण्यासाठी दूधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता. चपातीचे पीठ तयार झाल्यानंतर १५ मिनिटांसाठी झाकून ठेवून द्या. ज्यामुळे कणीक व्यवस्थित सेट होईल. नंतर पीठाचे मध्यम आकाराचे गोळे तोडून घ्या. हे गोळे तोडल्यानंतर पुन्हा एकदा हाताने मळून त्याची चपाती लाटून घ्या.
४) एका बाजूने जाड एका बाजूने पातळ अशी चपाती न लाटता सर्व बाजूंनी समान असेल अशी चपाती लाटा. जेणेकरून चपाती व्यवस्थित फुलेल. चपाती लाटल्यानंतर तव्यावर शेकण्यासाठी ठेवा.
५) चपाती दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकल्यानंतर तिसऱ्यांदा तुम्ही ही चपाती थेट आचेवर शेकू शकता. चपातीचे कणीक रात्री मळून फ्रिजमध्ये ठेवण्यापेक्षा तुम्ही सकाळी फ्रेश पिठाच्या चपात्या लाटू शकता.
केरळास्टाईल कांद्याची चमचमीत चटणी घरीच करा; सोपी रेसिपी, तोंडाला येईल चव-पोटभर जेवाल
६) चपाती मऊ राहण्यासाठी तुम्ही घडीची पोळी लाटू शकता किंवा चपातीच्या पिठाला आतल्या बाजूने तूप लावून मग चपाती लाटा. यामुळे चपाती लुसलुशीत, सॉफ्ट होईल. चपातीच्या पीठात तुम्ही २ ते ३ चमचे मक्याचे पीठ मिसळू शकता. चपाती लाटताना लाटणं वर न फिरता गोलाकार खालच्या दिशेने फिरवा.