Lokmat Sakhi >Food > रोज कणीक मळण्याचा कंटाळा येतो? २ मिनिटात मऊ कणीक मळण्याची ट्रिक, पोळ्या होतील झटपट

रोज कणीक मळण्याचा कंटाळा येतो? २ मिनिटात मऊ कणीक मळण्याची ट्रिक, पोळ्या होतील झटपट

How to Make Soft Chapati Dough : या ट्रिक्स वापरून तुम्ही अगदी २ ते ३ मिनिटात कणीक भिजवून घेऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 09:10 AM2023-01-01T09:10:00+5:302023-01-02T13:49:57+5:30

How to Make Soft Chapati Dough : या ट्रिक्स वापरून तुम्ही अगदी २ ते ३ मिनिटात कणीक भिजवून घेऊ शकता.

How to make soft chapati dough : Homemade Soft Chapati Daugh How to make Soft Roti | रोज कणीक मळण्याचा कंटाळा येतो? २ मिनिटात मऊ कणीक मळण्याची ट्रिक, पोळ्या होतील झटपट

रोज कणीक मळण्याचा कंटाळा येतो? २ मिनिटात मऊ कणीक मळण्याची ट्रिक, पोळ्या होतील झटपट

चपाती असो किंवा भाकऱ्या रोजच्या जेवणाची तयारी करताना कणीक मळावंच लागतं. काहींना कणीक भिजवायला बराच वेळ लागतो. रोज उठून तेच काम करायंच म्हटलं की खूप कंटाळा येतो. (Cooking Hacks) म्हणून रोजचं काम सोपं करणाऱ्या काही सोप्या ट्रिक्स पाहूया.  या ट्रिक्स वापरून तुम्ही अगदी २ ते ३ मिनिटात कणीक भिजवून घेऊ शकता. (How to make soft roti mixture at home)

१) कणीक मळण्यासाठी मोठं ताट वापरू नका. मोठं खोलगट भांड घ्या.

२) कणीक मऊ मळलं जाण्यासाठी ३ कप कणकेसाठी १ कप पाणी वापरा आणि मिक्स करून बाजूला ठेवून द्या

३) त्यानंतर  २० मिनिटं बाजूला ठेवून बाकीचं काम करा. 

४) २० मिनिटांनंतर कणीक व्यवस्थित भिजल्यानंतर तेल टाकून हातानं पीठ एकजीव करून घ्या. 

५) कणीक भिजवताना तुम्ही त्यात चिमुटभर मीठ घाला त्यानंतर चपात्या रुचकर लागतील

६) चपात्यांचे कणीक मळल्यानंतर लगेच चपात्या लाटायला सुरूवात करू नका.  १० ते १२ मिनिटं थांबून मग चपात्या लाटा.

७)  चपात्याचं पीठ रात्री मळून ठेवत असाल तर तेल लावून बंद डब्यात  झाकून फ्रिजमध्ये ठेवा जेणेकरून चपात्या काळ्या पडणार नाहीत.

८) चपात्याचं पीठ मळताना एकदम पाणी न घालता लागेल तसं थोडं थोडं घालत जा.

Web Title: How to make soft chapati dough : Homemade Soft Chapati Daugh How to make Soft Roti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.