Lokmat Sakhi >Food > सॉफ्ट-जाळीदार इडल्या करण्यासाठी खास टिप्स; तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ घाला, पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

सॉफ्ट-जाळीदार इडल्या करण्यासाठी खास टिप्स; तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ घाला, पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

How to Make Soft Idli Batter (Idli Making Tips) : विकतच्या इडलीसारखी परफेक्ट इडली करण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 01:14 PM2024-01-03T13:14:18+5:302024-01-03T15:23:22+5:30

How to Make Soft Idli Batter (Idli Making Tips) : विकतच्या इडलीसारखी परफेक्ट इडली करण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया.

How to Make Soft Idli Batter : South Indian Hotel Style Idli Making Tips and Tricks | सॉफ्ट-जाळीदार इडल्या करण्यासाठी खास टिप्स; तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ घाला, पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

सॉफ्ट-जाळीदार इडल्या करण्यासाठी खास टिप्स; तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ घाला, पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

घरी बनवलेली इडली सॉफ्ट, जाळीदार बनावी असं प्रत्येकालाच वाटतं. (Cooking Hacks) साऊथ इंडियन हॉटेलसारखी इडली घरी करणं एकदम सोपं आहे. त्यासाठी काही बेसिक टिप्स माहित असायलला हव्यात. (Idli Making Tips) थंडीच्या दिवसात इडलीचे बॅटर आंबत नाही, पीठ फुलत नाही अशी अनेकजणींची तक्रार असते. (Idli Recipe Soft Idli Batter With Tips) विकतच्या इडलीसारखी परफेक्ट इडली करण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. इडली करण्यासाठी तुम्हाला फार खर्च येणार नाही आणि घरातले सगळेजण पोटभर खातील. (How to Make South Indian Style Idli At Home)

मऊ-जाळीदार इडली करण्याची सोपी पद्धत (How to Make Soft, Spongy Idli at Home)

1) २ वाटी इडलीचा तांदूळ, अर्धी वाटी उडीदाची डाळ घ्या, १ टिस्पून मेथीचे दाणे घ्या, १ कप  साबुदाणा घ्या. साबुदाणा हा सिक्रेट इंग्रेडिएंट असून इडलीच्या पीठात साबुदाणे घातल्याने  चव अधिक वाढते आणि इडली मऊ होते.  ४ ते ५ तासांसाठी हे सर्व पदार्थ भिजवायला ठेवा नंतर पाणी उपसून दळून घ्या.

२) डाळीबरोबर मेथीचे दाणे घालून वाटून  घ्या आणि बारीक पेस्ट बनवा. त्यानंतर तांदूळ आणि साबुदाणे एकत्र करून बारीक दळून घ्या. भजीच्या पीठाप्रमाणेच याची कंसिटंन्सी असावी. जास्त पातळ किवा जाड असू नये. साबुदाण्यांमुळे याला पांढरा रंग चांगला येतो. यात तुम्ही वाटीभर पोह्याची पेस्टही घालू शकता.

३) थंडीच्या दिवसात आंबवण्याच्याआधी पिठात मीठ घालू नका. पीठ पूर्ण आंबल्यानंतर त्यात मीठ घाला. उन्हाळ्याच्या दिवसांत तुम्ही आधी मीठ घालू शकता. एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण ठेवा. 

सकाळी वॉक करता तरी पोट कमी होईना? वेट लॉससाठी वॉक करताना खाऊन जायचं की नाही-तज्ज्ञ सांगतात...

४) जवळपास ७ ते ८ तास हे मिश्रण आंबवण्यासाठी  ठेवा. रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी बॅटर तयार झालेलं असेल. पीठ व्यवस्थित आंबले की तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. या इडलीच्या बॅटरने तुम्ही इडली, अप्पे किंवा उत्तप्पा, डोसा करू शकता.

चपात्या कडक होतात-धड फुगत नाही? ५ टिप्स, चपात्या फुगतील भरपूर-होतील मऊसूत

५) इडली मेकरला तेलाने ग्रीस करून त्यात इडलीचे पीठ घाला. त्यानंतर कुकरमध्ये किंवा पातेल्यात ठेवून १० ते १५ मिनिटांसाठी इडली वाफवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड करून घ्या. त्यातील इडल्या बाहेर काढून सांबर किंवा चटणीबरोबर सर्व्ह करतात.

Web Title: How to Make Soft Idli Batter : South Indian Hotel Style Idli Making Tips and Tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.