Lokmat Sakhi >Food > इडल्या फसतात, मऊ-हलक्या होत नाही? परफेक्ट साऊथ इंडियन इडली करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

इडल्या फसतात, मऊ-हलक्या होत नाही? परफेक्ट साऊथ इंडियन इडली करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

How to make Soft Idli Recipe - 5 Cooking Tips : मऊसूत इडली करण्यासाठी काही टिप्स माहिती हव्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2024 05:27 PM2024-07-15T17:27:45+5:302024-07-16T11:41:53+5:30

How to make Soft Idli Recipe - 5 Cooking Tips : मऊसूत इडली करण्यासाठी काही टिप्स माहिती हव्याच

How to make Soft Idli Recipe - 5 Cooking Tips | इडल्या फसतात, मऊ-हलक्या होत नाही? परफेक्ट साऊथ इंडियन इडली करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

इडल्या फसतात, मऊ-हलक्या होत नाही? परफेक्ट साऊथ इंडियन इडली करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थ (South Indian Food) आपण खातोच (Food). इडली, डोसा, मेदू वडे, आप्पे आपण खातोच. पण घरात तयार केल्यास मनासारखी इडली तयार होत नाहीत. इडली खाण्याचे अनेक फायदे आहेत (Cooking Tips). इडली हा आंबवून केलेला पदार्थ आहे. आंबवलेल्या पीठात बरेच प्री बायोटिक्स, प्रो बायोटिक्स असतात जे पोटासाठी आणि आतड्यांसाठी चांगले असतात.

त्यामुळे नाश्त्याला आवर्जून इडली खाण्याचा सल्ला दिला जातो. इडली करताना आपलं गणित चुकतं. कधी प्रमाण तर कधी आंबवण्याची प्रोसेस चुकते. ज्यामुळे इडल्या फसतात. इडली साऊथ इंडियन स्टाईल करायची असेल तर, या रेसिपीला फॉलो करून पाहा. घरातच लुसलुशीत इडली तयार होईल(How to make Soft Idli Recipe - 5 Cooking Tips).

साऊथ इंडियन स्टाईल इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

उडीद डाळ

हॉटेलस्टाइल कुरकुरीत कोथिंबीर वडी घरी करायची आहे? वापरा १ सिक्रेट पदार्थ; वड्या होतील परफेक्ट

पाणी

मीठ

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये ४ कप जाड तांदूळ घ्या. त्यात पाणी घालून धुवून घ्या. नंतर त्यात पुन्हा २ कप पाणी घालून त्यावर झाकण ठेवा. दुसऱ्या बाऊलमध्ये १ कप उडीद डाळीमध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या. त्यात एक कप पाणी घालून डाळ आणि तांदूळ ८ तासांसाठी भिजत ठेवा.

कडीपत्त्याची खमंग चटणी; केस त्वचा आणि वजन घटवण्यास गुणकारी; पण चटणी करायची कशी?

८ तासानंतर मिक्सरच्या भांड्यात डाळ - तांदूळ घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून हाताने मिक्स करा, व त्यावर ८ तास झाकण ठेवा. जेणेकरून बॅटर व्यवस्थित आंबेल.

८ तासानंतर स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. इडली पात्राला ब्रशने तेल लावा. त्यावर चमचाभर बॅटर ओता. इडली पात्र स्टीमरमध्ये ठेवून झाकण लावा. १० ते १५ मिनिटांसाठी वाफेवर इडल्या शिजवून घ्या. अशा प्रकारे साऊथ इंडियन स्टाईल इडली खाण्यासाठी रेडी.

Web Title: How to make Soft Idli Recipe - 5 Cooking Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.