Lokmat Sakhi >Food > थंडीतही इडलीचे पीठ परफेक्ट फुलवण्याची १ सोपी ट्रिक; हॉटेलसारख्या मऊ-पांढऱ्याशुभ्र इडल्या बनतील

थंडीतही इडलीचे पीठ परफेक्ट फुलवण्याची १ सोपी ट्रिक; हॉटेलसारख्या मऊ-पांढऱ्याशुभ्र इडल्या बनतील

How to make Soft Idli Recipe : तांदूळ, उडीदाची डाळ या दोन पदार्थांचा वापर करून तुम्ही परफेक्ट इडली बॅटर बनवू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 10:20 AM2023-12-21T10:20:58+5:302023-12-21T13:11:48+5:30

How to make Soft Idli Recipe : तांदूळ, उडीदाची डाळ या दोन पदार्थांचा वापर करून तुम्ही परफेक्ट इडली बॅटर बनवू शकता. 

How to make Soft Idli Recipe : 5 Tips to Make Soft and Spongy Idli at Home in Marathi | थंडीतही इडलीचे पीठ परफेक्ट फुलवण्याची १ सोपी ट्रिक; हॉटेलसारख्या मऊ-पांढऱ्याशुभ्र इडल्या बनतील

थंडीतही इडलीचे पीठ परफेक्ट फुलवण्याची १ सोपी ट्रिक; हॉटेलसारख्या मऊ-पांढऱ्याशुभ्र इडल्या बनतील

हिवाळा असो किंवा उन्हाळा प्रत्येकालाच सकाळच्यावेळी इडली, डोसा असे साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप आवडते. (Cooking Hacks) हे पदार्थ खाल्ल्याने जास्तवेळ पोट भरल्यासारखं राहतं. यात कमी कॅलरीज असतात आणि पचायलाही हलके असतात. इडली, डोसा बाहेरून आणणं रोज रोज शक्य नसते. अशावेळी तुम्ही बाहेरुन हे पदार्थ आणण्याऐवजी घरच्याघरी परफेक्ट पद्धत वापरून इडली बनवू शकता. (Perfect Idli Making at Home)  तांदूळ, उडीदाची डाळ या दोन पदार्थांचा वापर करून तुम्ही परफेक्ट इडली बॅटर बनवू शकता. 

घरी इडलीचं पीठ व्यवस्थित फुलत नाही, हिवाळ्याच्या दिवसात पीठ आंबत नाही, इडल्या फारच कडक होतात, मऊ होत नाहीत अशी अनेकींची तक्रार असते (How to make Soft Idli Recipe) पण इडलीचं पीठ तयार करताना काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्या तर  इडल्या अजिबात बिघडणार नाहीत. इडलीचे पीठही चांगले फुलून येईल. (How to make idli batter)

इडली करण्यासाठी बॅटर तयार करण्याची योग्य पद्धत (How to Make Soft Idli With 5 Basic Tips)

१) सगळ्यात आधी तुकडा तांदूळ एका भांड्यात काढून घ्या. तुम्ही इडलीचे तांदूळ किंवा जाड तांदूळ वापरू शकता.  तांदूळ स्वच्छ धुवून  १ ते दीड ग्लास पाण्यात भिजवून ठेवा.

२) दुसऱ्या भांड्यात उडीदाची डाळ आणि चमचाभर मेथी मिक्स करून व्यवस्थित धुवून घ्या आणि दोन्ही पदार्थ भिजवायला ठेवा. 

३) ५ ते ६ तासानंतर तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्या आणि त्याच पद्धतीने  डाळ, पोहेसुद्धा वाटून एका भांड्यात काढून घ्या. वाटीभर पोहेसुद्धा १५ मिनिटं भिजवायला ठेव त्यानंतर दळून घ्या. सर्व जिन्नस वेगवेगळे  दळून घेतल्यानंतर डाळ आणि तांदळाचे, पोह्याचे मिश्रण एकजीव करा. त्यानंतर रात्रभर हे पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्या. 

थंडीत करा कढी पकोड्यांचा बेत; कढी अजिबात फुटणार नाही-रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम झटपट बेत

४) सकाळी पीठ व्यवस्थित फुललल्यानंतर त्यात मीठ आणि  थोडं पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्या. त्यानंतर इडलीच्या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा.

२ मिनिटांत नारळ फुटून खोबरं बाहेर निघेल; शेफ कुणाल कपूरनं सांगितली सोपी ट्रिक, किचकट काम होईल सोपं

5) इडलीच्या साच्याला तेल लावून त्यात  इडलीचे बॅटर भरा. त्यानंतर हे स्टॅण्ड्स कुकरमध्ये ठेवा आणि १० ते १५ मिनिटांसाठी वाफवून घ्या. तयार आहेत गरमागरम इडल्या. 
 

Web Title: How to make Soft Idli Recipe : 5 Tips to Make Soft and Spongy Idli at Home in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.