Join us  

अण्णाच्या ठेल्यावर मिळते तशी जाड तांदुळाची इडली करा घरीच, पाहा मऊ-लुसलुशीत इडलीची सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 1:24 PM

How to make Soft Idli Recipe : पीठ दळताना फक्त त्यात एक वाटीभर पांढरी गोष्ट घाला, इडल्या होतील परफेक्ट

सकाळचा नाश्ता (Breakfast) हा पौष्टिकतेने परिपूर्ण असावा. सकाळचा नाश्ता हेल्दी पदार्थ खाऊन केल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. त्यामुळे बरेच जण सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, चपाती-भाजी किंवा दाक्षिणात्य पदार्थ खातात. बरेच फिटनेस फ्रिक किंवा खवय्यावर्ग इडली-सांबार (Idli) खातात.

नाश्त्याला हलकी-फुलकी इडली खाल्ल्याने वजन तर वाढत नाही, पण आरोग्याला अनेक फायदे मिळतात. इडलीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, शिवाय त्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. बऱ्याचदा घरात हॉटेलस्टाईल इडली तयार होत नाही. जर आपल्याला अण्णा आपल्या ठेल्यावर ज्याप्रमाणे इडली तयार करतो, तशी इडली घरी तयार करायची असेल तर, जाड तांदुळाची इडली करून पाहा. मऊ-लुसलुशीत इडली घरीच (Cooking Tips) कमी साहित्यात तयार होईल(How to make Soft Idli Recipe).

जाड तांदुळाची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

जाड तांदूळ

उडीद डाळ

पाणी

पाक न करता करा रव्याचे तोंडात विरघळणारे झटपट लाडू, लाडू बिघडण्याचं टेंशनच नाही..

तेल

मीठ

पोहे

मेथी दाणे

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये ३ वाट्या जाड तांदूळ घ्या. नंतर त्यात एक वाटी उडीद डाळ घाला व २ वाट्या पाणी घालून डाळ-तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात एक वाटी पोहे, २ चमचे मेथी दाणे आणि २ कप पाणी घालून रात्रभरासाठी किंवा ५ ते ६ तासांसाठी भिजत ठेवा. डाळ-तांदूळ भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेली डाळ-तांदूळ घालून वाटून घ्या. तयार पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्या. पीठ आंबवण्यासाठी त्यावर ५ ते ६ तासांसाठी झाकण ठेवा. ६ तासानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

कुकरमध्ये इडली किंवा खिचडी होते, दही कधी लावून पाहिलं आहे का? १ सोपी ट्रिक- दही करण्याची नवी युक्ती

स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा, इडली पात्राला ब्रशने तेल लावा, व त्यात चमच्याने पीठ ओतून इडलीचं पात्र स्टीमरमध्ये ठेवा. १५ ते  २० मिनिटांसाठी मध्यम आचेवर इडली वाफवून घ्या. १५ मिनिटानंतर इडलीचं पात्र बाहेर थंड करण्यासाठी काढून ठेवा. हलक्या हाताने इडल्या चमच्याने काढून घ्या. अशा प्रकारे जाड तांदुळाची मऊ-लुसलुशीत इडली खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स