नाश्त्याला डोसा, मेदूवडा, इडली, अप्पे, उत्तप्पा, हे दक्षिण भारतीय पदार्थ सगळेचजण आवडीने खातात. हे पदार्थ खायला जितके चांगले लागतात तितकेच बनवायला अवघड वाटतात कारण तांदूळ निवडण्यापासून ते पीठ आंबवण्यापर्यंत अनेक लहान लहान कामं करावी लागतात. (How to Make Soft Idli With 4 Basic Tips)
इतके कष्ट घेऊनही घरी बनवलेली इडली फुलली नाही किंवा कडक झाली तर पदार्थ खाण्याचा आनंद घेता येत नाही. (Cooking Hacks) विकतसारखी मऊ, पांढरीशुभ्र इडली बनवण्यासाठी पीठ दळताना कोणत्या ट्रिक्स वापरायच्या ते पाहूया. जेणेकरून तुम्ही घरी केलेला बेत विकतच्या पदार्थांसारखा परफेक्ट होईल. (How to make Soft Idli Recipe)
१) घरी इडल्या बनवण्यासाठी ३ वाट्या तांदूळ घ्या. यासाठी तुम्ही कोणताही जुना किंवा जाड तांदूळ घेऊ शकता. उडीदाची डाळ घ्या, त्यात वाटीभर पोहे आणि साबुदाणे घालून धुवून घ्या. त्यात चमचाभर मेथी घालून थोडावेळ भिजवण्यासाठी ठेवा. ४ ते ५ तास भिजवल्यानंतर डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या.
२) त्यानंतर तांदूळ बारीक वाटून घ्या. डाळ आणि तांदूळाचे मिश्रण एकत्र करून घ्या आणि एकाच दिशेने फेटून घ्या. त्यानंतर पीठ व्यवस्थित सेट करण्याासाठी ठेवा.
३) ८ ते १० तास पीठ आंबवण्यासाठी ठेवल्यानंतर पीठ छान फुललेलं दिसेल. त्यानंतर इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्या आणि आणि इडलीचं पीठ त्यात घाला. १० ते १२ मिनिटं वाफवल्यानंतर छान, मऊ फुललेली इडली तुम्हाला खाता येईल.
४) इडलीचं पीठ व्यवस्थित फुलण्यासाठी साबुदाणे, पोहे आणि मेथीचे दाणे हे सिक्रेट घटक आहेत. या तिन्ही पदार्थांमुळे इडलीचं पीठ छान फुलतं आणि चव वाढवण्यास मदत होते.
सोप्या पद्धतीने सांबार कसे बनवावे
१) साऊथ इंडियन स्टाईलचे सांबार बनवण्यासाठी सगळ्यात आधी चिंच पाण्यात घालून २० ते २५ मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर गाळून चिंचेचा गर वेगळा करा. तुरीची डाळ व्यवस्थित धुवून सुकवून घ्या. त्यानंत टोमॅटो, कांदा, शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित चिरून घ्या.
डाळ तांदूळ न वाटता-न आंबवता १० मिनिटांत करा पौष्टीक डोसा; सोपी रेसिपी-झटपट नाश्ता
२) मग गॅसवर कुकर ठेवून मंद आचेवर ठेवा. त्यात २ कप पाणी घालून डाळ, कापलेल्या भाज्या आणि चिंचेचा कोळ घाला. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हळद घालून कुकरचं झाकण बंद करा. २ ते ३ शिट्ट्या घेतल्यानंतर गॅस बंद करा. कुकर थंड झाल्यानंतर एका भांड्यात डाळ काढून घ्या.
३) गॅसवर कढई ठेवून त्यात शिजवलेली डाळ झाला. त्यात पाणी मिसळा. सांभार उकळ्यानंतर त्यात गूळ आणि सांबार पावडर घालून १० मिनिटं शिजवून घ्या डाळ घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.
चमचमीत भरली भेंडी 'या' नव्या पद्धतीने करा; भेंडी चिकट होणार नाही-आवडीने खातील सगळे
४) मग डाळीला फोडणी देण्यासाठी एका छोट्या भांड्यात एक ते २ चमचे तेल घालून मोहोरी घाला. मोहोरी तडतडल्यानंतर त्यात लाल मिरची, हिंग, कढीपत्ता घाला. तयार फोडणी डाळीवर घालून चमच्याने ढवळून घ्या तयार आहे गरगमागरम स्वादीष्ट सांबार.