Lokmat Sakhi >Food > फक्त ५ स्टेप्स आणि घरातच तयार होईल सुपर सॉफ्ट इडली; दाक्षिणात्य पद्धतीची इडली हवी असेल तर..

फक्त ५ स्टेप्स आणि घरातच तयार होईल सुपर सॉफ्ट इडली; दाक्षिणात्य पद्धतीची इडली हवी असेल तर..

How to Make Soft Idli with 5 Basic Tips | Spongy Idli Batter with Wet Grinder - No Soda No Yeast : इडली स्पॉंजी - जाळीदार होण्यासाठी फॉलो करा फक्त ५ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2024 10:00 AM2024-08-10T10:00:32+5:302024-08-10T10:05:02+5:30

How to Make Soft Idli with 5 Basic Tips | Spongy Idli Batter with Wet Grinder - No Soda No Yeast : इडली स्पॉंजी - जाळीदार होण्यासाठी फॉलो करा फक्त ५ टिप्स

How to Make Soft Idli with 5 Basic Tips | Spongy Idli Batter with Wet Grinder - No Soda No Yeast | फक्त ५ स्टेप्स आणि घरातच तयार होईल सुपर सॉफ्ट इडली; दाक्षिणात्य पद्धतीची इडली हवी असेल तर..

फक्त ५ स्टेप्स आणि घरातच तयार होईल सुपर सॉफ्ट इडली; दाक्षिणात्य पद्धतीची इडली हवी असेल तर..

इडली हा बहुतांश लोकांचा आवडीचा नाश्ता (Idli Recipe). इडली खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हा हेल्दी ब्रेकफास्ट खाल्ल्याने आपल्याला दिवसभर उत्साही आणि तंदुरुस्त वाटते (Cooking Tips). पण इडली तयार करणं हे काहींना किचकट काम वाटतं. डाळ - तांदूळ भिजत घाला, नंतर आंबवण्यासाठी ठेवा (South Style Idli). तरीही काही चुकांमुळे इडली कडक होते. शेवटी आपण अण्णाच्या स्टॉलवर जाऊन इडली खातो.

बऱ्याचदा आपण विचार करतो, दाक्षिणात्य लोकांची परफेक्ट इडली कशी तयार होते? जर आपल्यालाही दाक्षिणात्य स्टाईल स्पॉंजी - जाळीदार इडली करायची असेल तर करताना ५ टिप्स फॉलो करा. इडल्या परफेक्ट जमतील(How to Make Soft Idli with 5 Basic Tips | Spongy Idli Batter with Wet Grinder - No Soda No Yeast).

इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

उडीद डाळ

तांदूळ

मीठ

शिल्पा शेट्टीसारखी फिगर आणि फिटनेस पाहिजे? 'या' पिठाची खा भाकरी, पोट सपाट - त्वचाही चमकते..

पाणी

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक कप उडीद डाळ घ्या. त्यात पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या. दुसऱ्या बाऊलमध्ये २ कप तांदूळ घ्या. त्यात पाणी घालून तांदूळ धुवून घ्या. डाळ - तांदुळामध्ये पाणी घाला, आणि ४ तासांसाठी भिजत ठेवा. ४ तासानंतर मिक्सरच्या भांड्यात उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे वाटून घ्या.

एक मोठा बाऊल घ्या. त्यात वाटलेली उडीद डाळ आणि तांदुळाची पेस्ट घालून हाताने मिक्स करा. नंतर आंबवण्यासाठी झाकण ठेवा. निदान ८ तासांसाठी फरमेण्ट होण्यासाठी रूम टेम्प्रेचमध्ये भांडं ठेवा. ८ तासानंतर बॅटर व्यवस्थित आंबलेलं आपल्याला पाहायला मिळेल.

भिजलेले बदाम की शेंगदाणे? सद्गुरू सांगतात मुठभर 'ही' गोष्ट खा; दिवसभर राहाल एनर्जेटिक

त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून हलक्या हाताने मिक्स करा. अशा प्रकारे आपलं इडली बॅटर रेडी. इडली पात्राला ब्रशने तेल लावा. त्यात चमचाभर बॅटर ओता. स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा, त्यात इडली पात्र ठेऊन झाकण लावा. १० मिनिटांसाठी इडली वाफेवर शिजवून घ्या. अशा प्रकारे गुबगुबीत मऊ जाळीदार इडली खाण्यासाठी रेडी. 

Web Title: How to Make Soft Idli with 5 Basic Tips | Spongy Idli Batter with Wet Grinder - No Soda No Yeast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.