आपल्या रोजच्या आहारातील पदार्थ म्हणजे चपाती (Chapati Making). भारतीय लोकांचे पोट चपातीशिवाय भरत नाही. काही लोकं चपाती, रोटी, पोळी किंवा फुलके म्हणतात. प्रत्येकाला टम्म फुललेली चपाती आवडते. परंतु, सगळ्यांनाच गोल, लुसलुशीत पोळी करायला जमेलच असे नाही. कणिक मळण्यापासून ते पोळी शेकण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने शिकणं गरजेचं आहे. कारण या गोष्टी शिकल्यानंतरच पोळी लुसलुशीत टम्म फुगलेली तयार होते. पण कणिक मळताना एकही चूक जरी घडली तर, चपाती करण्याचं पूर्ण गणित बिघडू शकतं.
ज्यामुळे आपली पोळी फुलत नाही आणि काही वेळात पापडासारखी कडक होते. पण काही लोकांच्या पोळीचा नकाशा तयार होतो (Cooking Tips). ती व्यवस्थित गोल आकारची तयार होत नाही. जर आपल्याला पोळपाट लाटण्याशिवाय गोल आकाराची पोळी तयार करायची असेल तर, ही ट्रिक नक्कीच वापरून पाहा. या ट्रिकमुळे काही सेकंदात पोळी गोल तयार होईल(How to make soft Roti | How to roll perfect round Chapati).
आकाराने गोल पोळी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
कणिक
एक लिटर तेलाची पिशवी
ना बटाटे उकडण्याची गरज-ना कणिक मळण्याची झंझट, पाहा आलू पराठा करण्याची सोपी कृती, पराठे होतील झटपट
स्टीलची प्लेट
कृती
ज्यांना पोळी तयार करण्यासाठी वेळ नसतो, ते पोळी तयार करण्याची महागडी मशीन घरी आणतात. त्या मशीनच्या मदतीने पोळी झटपट गोल तयार होते. जर आपल्याला महागडी मशीन विकत घ्यायची नसेल तर, प्लास्टिकच्या वापराने देखील आपण गोल आकाराची पोळी झटपट तयार करू शकता.
बऱ्याचदा आपण एक लिटर तेलाची प्लास्टिक पिशवी फेकून देतो. पण याच्या वापराने आपण काही सेकंदात पोळी तयार करू शकता. काही वेळेला पोळपाट लाटण्याच्या वापराने केलेली तयार पोळी एका बाजूने जाड किंवा पातळ होते. पण प्लास्टिकच्या वापराने ती एकसारखी तयार होईल.
तेलाचा एकही थेंब न वापरता करा पोह्याचे मेदू वडे, हेल्दी पण चमचमीत रेसिपी-वेटलॉससाठीही खूप उपयोगी
यासाठी एक लिटर तेलाची पिशवी घ्या. तिला मधोमध कट करा. कणकेचा एक गोळा घ्या, तयार गोळा तेलाच्या पिशवीच्या मधोमध ठेवा. त्यावर थोडे तेल लावून पसरवा. जेणेकरून कणकेचा गोळा पिशवीला चिटकणार नाही. कणकेचा गोळा ठेवल्यानंतर प्लास्टिकच्या दुसऱ्या बाजूने कव्हर करा, व त्यावर एक स्टीलची प्लेट ठेऊन हलक्या हाताने दाब द्या. अशा प्रकारे काही सेकंदात एकाच आकाराची पोळी तयार होईल.