Join us  

चपात्या कडक-वातड होऊ नयेत म्हणून ४ टिप्स, सकाळी केलेल्या चपात्या रात्रीपर्यंत राहतील मऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 2:33 PM

How To Make Soft Roti/Chapati? (Indian Flatbread) सकाळच्या घाईत डब्यासाठी केलेल्या चपात्या वातड होतात? घ्या खास टिप्स

कोणतीही भारतीय थाळी चपातीशिवाय अपूर्ण आहे. चपाती बनवणे देखील एक कला आहे. सुरुवातीला चपाती करताना ती मऊ व गोल आकाराची होईलच असे नाही. ती अनेकदा कडक व जाडसर तयार होते. चपाती करण्याची मुख्य स्टेप ही पीठ मळणे आहे. अनेकांची तक्रार असते, पीठ मळताना पीठ कडक मळले जाते, ज्यामुळे चपात्या नीट तयार होत नाही.

मीठ मऊ मळले गेल्यानंतर, या कणकेच्या चपात्या सॉफ्ट व टम्म फुलतात. यासह या चपात्या अधिक काळ मऊ व नरम राहतात. सकाळी ऑफिस व शाळेत जाणाऱ्यांची घाई असते, अशा स्थितीत जर आपल्याला झटपट व सॉफ्ट चपात्यांसाठी कणिक मळायचे असेल तर, या ४ ट्रिक फॉलो करून पाहा(How To Make Soft Roti/Chapati? (Indian Flatbread)).

मऊ चपात्यांसाठी कणिक कसे मळायचे

कोमट पाणी

कणिक झटपट व सॉफ्ट मळून तयार व्हावे यासाठी, एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. चवीला आपण त्यात मीठ देखील घालू शकता. मीठ घातल्यानंतर त्यात थोडे कोमट पाणी मिक्स करा. आता हाताने पीठ चांगले मळून घ्या. पीठ मळताना हळू - हळू पाणी घालून पीठ मळावे. जेणेकरून पाण्याचाही अंदाज येतो, पिठात जास्त पाणी मिक्स देखील होत नाही. पीठ मळून झाल्यानंतर हात ओले करून चांगले दाबून मळून घ्या. अशा स्थितीत कणिक सहज मळले जाते, व चपात्या देखील मऊ तयार होतात.

पावसाळ्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? १० मिनिटात करा स्पंजी गुलगुले, गोड आणि पौष्टिकही

पनीरचे पाणी

कणिक कडक होत असतील, तर पीठ मळताना साधं पाणी वापरण्याऐवजी फाटलेलं दुधाचे पाणी किंवा पनीरच्या पाण्याचा वापर करा. फाटलेल्या दुधाच्या पाण्याने पीठ मळल्यानंतर पीठ अगदी सहज मळले जाते. ज्यामुळे या कणकेच्या चपात्या अगदी मऊ व टम्म फुगलेले तयार होतात.

तेल

कणिक मळल्यानंतर चपात्या लवकर कडक होत असतील तर, कणिक मळून झाल्यानंतर त्यात एक चमचा गरम तेल घालून मळून घ्या, किंवा हाताला तेल लावून कणिक पुन्हा मळून घ्या. या ट्रिकमुळे कणिक लवकर कडक होणार नाही, व लवकर मळून तयार होईल.

नाश्त्याला करा इन्स्टंट रवा ढोकळा, गुजराथी रेसिपी करायला सोपी - पोटभर आणि पौष्टिक

दुधाचा वापर

मऊ कणिक तयार करण्यासाठी आपण दुधाचाही वापर करू शकता. यासाठी परातीत गव्हाचं पीठ घ्या, त्यात एक वाटी दूध मिसळून कणिक मळून घ्या. कणिक मळताना आपण पाण्याचा देखील वापर करू शकता. या ट्रिकमुळे कणिक मऊ मळून तयार होईल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स