Lokmat Sakhi >Food > फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या वातड- काळपट होतात? ३ टिप्स, पोळ्या होतील मऊ-फुगतील टम्म

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या वातड- काळपट होतात? ३ टिप्स, पोळ्या होतील मऊ-फुगतील टम्म

Simple Tips And Tricks For Making Soft Rotis Or Chapati: फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या वातड, काळपट होत असतील तर या काही गोष्टी एकदा ट्राय करून पाहा...(how to make soft rotis or chapati from the dough keft in fridge?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2024 09:09 AM2024-10-19T09:09:48+5:302024-10-19T16:17:14+5:30

Simple Tips And Tricks For Making Soft Rotis Or Chapati: फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या वातड, काळपट होत असतील तर या काही गोष्टी एकदा ट्राय करून पाहा...(how to make soft rotis or chapati from the dough keft in fridge?)

how to make soft rotis or chapati from the dough keft in fridge for long, Simple Tips And Tricks For Making Soft Rotis Or Chapati | फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या वातड- काळपट होतात? ३ टिप्स, पोळ्या होतील मऊ-फुगतील टम्म

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या वातड- काळपट होतात? ३ टिप्स, पोळ्या होतील मऊ-फुगतील टम्म

Highlightsफ्रिजमध्ये आधीपासून भिजवून ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या थोड्या वातड येतात. तसेच त्यांना थोडा काळसर रंग येतो.

बऱ्याचदा असं होतं की सकाळी भिजवलेली कणिक थोडी जास्त उरते. त्यामुळे आपण मग ती जास्तीची कणिक फ्रिजमध्ये ठेवून देतो जेणेकरून संध्याकाळी तिच्या पोळ्या लाटता येतील. काही जणींना सकाळ- संध्याकाळी दोन्ही वेळांना कणिक भिजवणं थोडं वेळखाऊ वाटतं. आयती भिजवलेली कणिक हाताशी असेल तर सरसर पोळ्या लाटता येतात. त्यामुळे काही जणी दोन्ही वेळची कणिक एकदाच मळून ठेवतात (Simple Tips And Tricks For Making Soft Rotis Or Chapati). पण त्यातही असं हाेतं की फ्रिजमध्ये आधीपासून भिजवून ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या थोड्या वातड येतात. तसेच त्यांना थोडा काळसर रंग येतो. असं होऊ नये म्हणून काय करावं ते पाहा.. (how to make soft rotis or chapati from the dough keft in fridge?)

 

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या मऊ होण्यासाठी टिप्स...

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शक्यतो नेहमीच ताजी कणिक भिजवून तिच्या पोळ्या करणे कधीही चांगले. पण वेळेअभावी तुम्हाला ते शक्य नसेल तर कणिक जास्त शिळी होऊ देऊ नका. एकदा भिजवलेली कणिक ८ ते १० तासांमध्येच संपवून टाका. अशा भिजवून ठेवलेल्या कणकेच्या पेाळया चांगल्या होण्यासाठी काय करायचं ते पाहा...

दिवाळीचा फराळ कमीतकमी तेलात तळण्यासाठी ५ टिप्स, पैशांची बचत आणि आरोग्याचीही काळजी

१. कणिक फ्रिजमधून बाहेर काढून लगेच तिच्या पोळ्या लाटू नका. ती कणिक थोडी रुम टेम्परेचरवर येऊ द्या.

२. कणिक रुम टेम्परेचरवर आल्यानंतर तिच्यात थोडं कोमट पाणी करून टाका आणि तेलाचा हात लावून कणिक पुन्हा मळून घ्या. पाणी टाकल्यामुळे कणकेत जर थोडा सैलपणा आला असेल तर त्यात तुम्ही आणखी थोडं पीठ टाकू शकता.

 

३. भिजवून ठेवलेल्या कणकेची पोळी कधीही खूप घाईघाईने गॅस मोठा करून भाजू नका. अशा कणकेची पोळी नेहमी मध्यम आचेवर ठेवावी.

जुन्या ब्लाऊजला द्या नवा डिझायनर लूक! ४ स्वस्तात मस्त आयडिया- महागडं ब्लाऊज घेण्याची गरजच नाही

४. ज्यावेळी तुम्हाला अशी जास्तीची कणिक भिजवून ठेवायची असेल तेव्हा ती भिजविण्यासाठी फ्रिजमधले थंडगार पाणी वापरा. त्यामुळे कणिक अधिककाळ चांगली राहील. काळी पडणार नाही. 

 

Web Title: how to make soft rotis or chapati from the dough keft in fridge for long, Simple Tips And Tricks For Making Soft Rotis Or Chapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.