नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. नाश्त्याला तुम्ही मऊ, जाळीदार डोसेही खाऊ शकता. डोसा नेहमी बाहेरचाच खायला हवा असं काही नाही घरी बनवलेले डोसे अगदी कमीत कमी वेळात तयार होतात आणि तब्येतीलाही पौष्टीक करतात. (South Indian style dosa making Tips) साऊथ इंडियन पदार्थ नेहमी बाहेरच्या गाडीवर किंवा रेस्टॉरंटमध्येच चवदार लागतात असं काहीचं मत असतं. पण योग्य पद्धत वापरली तर कमीत कमी वेळात तुम्ही अस्सल साऊथ इंडियन चवीचे डोसे बनवू शकता. (Soft & Spongy Dosa Recipe with just 3 ingredients)
झटपट अप्पम बनवण्याची रेसिपी
- अप्पम बनवण्यासाठी सगळ्यात आधी २ कप तांदूळ ६ तासांसाठी भिजवून ठेवा. त्यात १ कप नारळाचा किस, १ वाटी शिजवलेला भात घाला. पाण्यात २ चमचे साखर घाला.
दही नीट लागत नाही, आंबट होतं? १ सोपी ट्रिक; विकतसारखं घट्ट दही आता मिळेल घरीच
- एका भांड्यात दळलेले तांदूळ काढून घ्या. त्यात चमचाभर मीठ आणि यिस्टचं पाणी घाला. हे मिश्रण चमच्यानं व्यवस्थित ढवळून घ्या. पीठ आंबवण्यासाठी काहीवेळ तसंच ठेवा.
- पीठ फुलून वर आलं की एक तव्याला तेल लावून त्यावर गरमागरम जाळीदार डोसे काढून घ्या. हे मऊ डोसे तुम्ही बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसह खाऊ शकता.